Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अतृप्त लिंगदेहाविषयी साधिकेला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

     ‘माझ्या बहिणीचा मुलगा याचा वर्ष २०१६ मध्ये ‘ब्लड कॅन्सर’ने मृत्यू झाला. त्या वेळी त्याच्या १० वीच्या परीक्षेचा तिसरा पेपर चालू होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या लिंगदेहाविषयी जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.
१. लिंगदेहाविषयी जाणवलेली सूत्रे
१ अ. मुलाचा सूक्ष्म-देह त्याच्या मृतदेहाजवळ घुटमळत असल्याचे जाणवणे : त्याचा मृतदेह त्याच्या गावी धाकवली येथे होता. तेव्हा त्याच्या प्रेताजवळ त्याचा सूक्ष्म-देह घुटमळत असल्याचे जाणवले. मृत्यूसमयी त्याच्या मनात परीक्षा देणे, गुण मिळवणे, पुढे शिकणे, या तीव्र इच्छा होत्या. तेव्हा त्याच्या लिंगदेहाला ‘आपण शरिरापासून वेगळे झालो आहोत. इतर सर्व का रडतात ?’, हेे कळत नसल्याने तो गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे जाणवले.
१ आ. लिंगदेहावरील रज-तमात्मक आवरणामुळे त्याला मृत्यू झाल्याचे स्वीकारता न येणे : त्याचा मृतदेह मुंबईहून गावाला नेईपर्यंत ८ ते १० घंटे झाले होते. घरात नेल्यावर मला त्याचा लिंगदेह पुन्हा दिसू लागला. ८ ते १० घंटे तो लिंगदेह मृतदेहाजवळच बसून होता. त्याला ‘आपण मेलो आहोत. आता परीक्षा देऊ शकत नाही. शिकू शकत नाही’, हे कळायचे, तर मध्येच ‘आपण मेलो नाही’, असेही वाटायचे. असा गोंधळ त्याच्यावर आलेल्या रज-तमात्मक आवरणामुळे झाल्याचे जाणवले.
१ इ. लिंगदेहाला पूर्वज त्रास देत असल्याचे जाणवणे : त्याच्या लिंगदेहाभोवती पुष्कळ काळे आवरण आणि जडत्व जाणवले. ‘काही कालावधीने त्याच्या लिंगदेहाला त्याचेच पूर्वज पुष्कळ त्रास देऊ लागले. काही गंमत म्हणून, तर काही रागाने त्रास देत होते’, असे मला जाणवले. काही पूर्वजांच्या लिंगदेहांचे डोळे लाल-काळे होतेे. तेव्हा मी त्याला सूक्ष्मातून दत्ताचा जप करण्यास सांगितले. 
२. लिंगदेहाला साधना करण्यास सांगणे
२ अ. लिंगदेहाला सूक्ष्मातून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करण्यास सांगणे : मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, ‘तू आता शरिरापासून वेगळा झाला आहेस. तू जिवंत नाहीस.’ तेव्हा ‘तो माझे बोलणे ऐकत आहे’, असे मला जाणवले. त्याचा देवावर फारसा विश्‍वास नव्हता. मी त्याला म्हणाले, ‘तू ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप कर. तुला आता परीक्षा देता येणार नाही, हे स्वीकारायला हवे. देवावर विश्‍वास नसला, तरी नामजप कर.’ 
२ आ. दत्ताचा नामजप करण्यास शिकवल्यावर लिंगदेहाला पुष्कळ प्रयत्न करून जप करता येणे : त्याला हा जप करणे पुष्कळ कठीण जात होते. मी एकदा म्हणत होते, पुढे तो म्हणत होता. तेव्हा तो ‘मनापासून नामजप करायला सिद्ध नव्हता. तो नाइलाजाने दत्ताचे नाम घेत होता’, असे मला जाणवले. ‘मी नामजप म्हणून दाखवला, तरच तो म्हणत होता, अन्यथा तो नामजप विसरत होता’, असे मला जाणवले.
२ इ. अहंकार अल्प असल्याने लिंगदेह मृत्यूनंतरही नामजप करू शकत असल्याचे जाणवणे : त्याने जिवंतपणी १५ वर्षांपर्यंत अभ्यासाला महत्त्व दिले. तो बुद्धीमान होता. त्याला विज्ञान आवडत होते. तो बुद्धीवादी आणि बुद्धीमान होता; मात्र त्याच्यात अहंकार अल्प जाणवत होता. त्यामुळे माझ्या सांगण्यानुसार मृत्यूनंतरही तो नामजप करू शकत होता. 
२ ई. लिंगदेहाने पूर्वजांचे आत्मे त्रास देत असल्याचे सांगणे आणि ‘नामजप आणि प्रार्थना यांमुळे पूर्वज त्रास देत नाहीत’, हे त्याच्या लक्षात येणे : तो मला मध्येच विचारत होता, ‘मला बुवा त्रास देतो. काय करू ?’ मी सांगितले, ‘नामजप कर, मग बुवा त्रास देणार नाही.’ (तो पूर्वजांना ‘बुवा’ म्हणत होता.) त्या वेळी मी त्याला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप आणि प्रार्थना शिकवल्या. त्याप्रमाणे तो करू लागला. नामजप आणि प्रार्थना यांमुळे त्याच्या लिंगदेहाभोवतीचे काळे आवरण न्यून होत जाऊन त्याला नामजप करता येऊ लागला. त्याच्या लिंगदेहाच्या लक्षात आले, ‘जप आणि प्रार्थना केल्यावर त्रास देणारे पूर्वज लांब जातात.’ त्यामुळे तो जप करू लागला. 
२ उ. लिंगदेहाने आश्रमात येऊन साधनेविषयी मार्गदर्शन घेणे : अडचण आली किंवा कुणी त्रास दिला, तर तो लिंगदेह आश्रमात येऊन मला ‘मावशी मी काय करू ?’, असे विचारत असे. मग मी त्याला ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीला प्रदक्षिणा घाल, तेथेच बसून नामजप कर’, असे सांगितले. ‘तेथे पूर्वज येत नाहीत’, हे त्याने अनुभवले. 
२ ऊ. ऐकण्याची अन् शिकण्याची वृत्ती असल्याने नामजप करून अनुभूती घेऊ शकणे : अजूनही अभ्यास, शिक्षण, ‘करीअर’ हे विषय त्याच्या लिंगदेहात जडत्वरूपात जाणवतात. मुळात बुद्धीवादी असूनही इतरांच्या तुलनेत अल्प संस्कार असल्याने आणि ऐकण्याची अन् शिकण्याची वृत्ती असल्याने तो नामजप करून अनुभूती घेऊ शकला.
२ ए. लिंगदेहाने त्याच्या आई-वडिलांनाही नामजप करण्यास सांगण्याचा प्रयत्न करणे आणि आई-वडिलांना त्याचे बोलणे कळत नसल्याने त्यांना नामजपाविषयी सांगण्यास साधिकेला सांगणे : नंतर त्याच्या लिंगदेहाला त्रास देणारे पूर्वज त्याच्या आई-वडिलांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास देत असल्याचे दिसले; म्हणून त्याने मला सांगितले, ‘माझ्या आई-बाबांना बुवा त्रास देतात. आई-बाबांनाही ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप सांग ना !’ त्या वेळी ‘त्याच्या आई-वडिलांना त्यांचे पूर्वज सूक्ष्मातून त्रास देतात’, हे मलाही जाणवत होते. प्रत्यक्षात त्यांना हे पटत नसल्याने ते नामजप करायला सिद्ध नाहीत. मुलाच्या लिंगदेहाला आई-वडिलांचा त्रास पाहून पुष्कळ दु:ख होत असल्याचे मला जाणवले. त्याचा लिंगदेह त्याच्या आई-वडिलांना नामजपाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत असून त्यांना त्याचे बोलणे कळत नसल्याने तो ‘त्याविषयी मी त्यांना सांगावे’, असे मला सांगत होता. 
३. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. ‘इच्छा अपुर्‍या राहिल्या की, त्रास कसा होतो ?’, हे माझ्या लक्षात आले आणि शिकायला मिळाले. 
आ. ‘जिवंतपणी नामाचा आणि साधनेचा संस्कार झाला, तरच त्या व्यक्तीचा लिंगदेह साधना करू शकतो आणि त्याला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाही.’ 
इ. ‘जिवंतपणी साधना नसेल, तर मृत्यूत्तर नामजप करणे किती कठीण जाते ?’, हे शिकायला मिळाले.’
- एक साधिका, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn