Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संस्कृती भ्रष्ट करणारा अन् युवा पिढीला नासवणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करा ! - रणरागिनी

मारुती चौक येथे आंदोलन करतांना रणरागिणी शाखेच्या महिला
रणरागिणी शाखेची आंदोलनाद्वारे नारीशक्तीची चेतावणी सनबर्न फेस्टिव्हल रहित करा !
      सांगली, २४ डिसेंबर (वार्ता.) - अमली पदार्थांचा गैरवापर आणि अनैतिक कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला सनबर्न फेस्टिव्हल गोव्यातून सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असणार्‍या पुण्यात हालवण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल संस्कृती भ्रष्ट करणारा अन् युवा पिढीला नासवणारा असल्याने २८ ते ३१ डिसेंबर २०१६ या काळात पुणे येथे होणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. मधुरा तोफखाने यांनी केली. त्या २४ डिसेंबर या दिवशी मारुती चौक येथे झालेल्या आंदोलनप्रसंगी बोलत होत्या. या वेळी ३१ डिसेंबर या दिवशी गडकोटांच्या पावित्र्य रक्षणासाठी शिवभक्त, शिवप्रेमी संघटना, पोलीस आणि प्रशासन यांनी साहाय्य करावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस यांनी केले. या प्रसंगी ९० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ महिला उपस्थित होत्या. या वेळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले, याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिक थांबून विषय ऐकत होते.
     या वेळी स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या सौ. वर्षा देशपांडे म्हणाल्या, देशाला स्वांतत्र्य मिळाले; पण आपण खरोखरच स्वतंत्र झालो आहोत का ? अद्यापही अनेक पाश्‍चात्त्य परंपरांच्या आपण मानसिक गुलामगिरीत आहोत. भारतीय संस्कृती महान असून आपल्याला प्राचीन परंपरा आहेत. त्यामुळे हिंदु संस्कृतीचा महान असा वारसा लक्षात घेऊन आपण नवीन वर्ष हे १ जानेवारीला न साजरे करता गुढीपाडव्यालाच साजरे केले पाहिजे.
     या वेळी माजी मुख्याधिपिका श्रीमती लता कोल्हटकर म्हणाल्या, पाश्‍चात्त्यांच्या वातावरणात आणि भारतियांच्या वातावरणात मोठा फरक आहे. भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याला अनेक चांगले पालट होतात. झाडांना पालवी फुटते. याउलट असे काहीही पाश्‍चात्त्य संस्कृतीत घडत नाही. होळी, रंगपंचमी, दिवाळी अशा प्रत्येक सणाला धर्मशास्त्रीय आधार आहे. हिंदूंनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा या गुढीपाडव्याला दिल्या पाहिजेत.
     या वेळी भाजपच्या सौ. आशताई पोतदार, संस्कृत शिक्षिका सौ. संपदा पाटणकर, श्रीमती हेमा मानधना यांनीही मनोगत व्यक्त केले.
सहभागी संघटना - स्वा. सावरकर प्रतिष्ठान, माहेश्‍वरी महिला संघटना, भाजप, हिंदु विधीज्ञ परिषद, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, प.पू. अनिरुद्धबापू संप्रदाय
उपस्थित मान्यवर - स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या सौ. वर्षा देशपांडे, कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी महिला संघटनेच्या साहित्य आणि सांस्कृतिक समितीच्या प्रमुख श्रीमती हेमा मानधना, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन, प.पू. अनिरुद्ध बापू संप्रदायाच्या सौ. आरती कुरबेट्टी, माजी मुख्याध्यापिका श्रीमती लता कोल्हटकर
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn