Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राचे महत्त्व जाणा ! - पू. नंदकुमार जाधव

नांद्रा (जळगाव) येथे ४०० हून अधिक धर्माभिमान्यांच्या उपस्थितीत पार पडली ग्रामसभा !
दिपप्रज्वलन करताना पू. नंदकुमार जाधव
आणि बाजूला कु. रागेश्री देशपांडे 
     जळगाव, १३ डिसेंबर (वार्ता.) - आजच्या लोकशाही व्यवस्थेत बहुमत असूनसद्धा हिंदुहिताचे निर्णय शासन घेत नाही. संसदेतील ३० टक्के उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यांच्याकडून आपण चांगल्या कार्याची अपेक्षा तरी करू शकतो का ? यावरून लोकशाहीची निरर्थकता सिद्ध होते. या सर्वांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी केले. २५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांना याची माहिती व्हावी, यासाठी गावातील युवकांनी उत्स्फूर्तपणे ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्या वेळी पू. जाधवकाका बोलत होते. या सभेला ४०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
     या सभेचा आरंभ शंखनादाने होऊन सनातन संस्थेचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या. सभेचे सूत्रसंचालन कु. तेजस्वीनी तांबट यांनी केले.
      रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे या वेळी म्हणाल्या की, आज महिलांनी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण केले पाहिजे. तसेच प्रतिदिन कपाळावर कुंकू लावणे, बांगड्या घालणे आदी धर्माचरणाच्या कृती नियमितपणे केल्या पाहिजेत. त्यामुळे ईश्‍वराचा आशीर्वाद मिळण्यास साहाय्य होते. ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांच्या विरोधात महिलांनी सावध राहून प्रत्येक महिलेने स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण घ्यायला हवे. 
क्षणचित्रे 
१. पू. नंदकुमार जाधव यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील आदी प्रतिष्ठित नागरिकांना श्रीफळ देऊन गावकर्‍यांना सभेला घेऊन येण्याचे आवाहन केले. 
२. गावातील युवकांनी ढोल-ताशांच्या गजरात वक्त्यांचे स्वागत केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn