Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

हिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व
     ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
५. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने साधनेची आवश्यकता 
५ अ. धर्मसंस्थापनेचे कार्य यशस्वी होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसह साधनेचे बळ असणे आवश्यक ! : ‘साधनेचे बळ आणि समर्थ रामदासस्वामींचे मार्गदर्शन असल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक क्रांतीविरांमध्ये प्रखर राष्ट्राभिमान असूनही साधनेचे बळ नसल्यामुळे त्यांची क्रांती यशस्वी न होता त्यांना नाहक प्राण गमवावे लागले होते.
राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांनी ‘दासबोध’ ग्रंथात लिहिले आहे,
     सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
     परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ 
- दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६
अर्थ : चळवळ करणे आपल्या हातात आहे; परंतु कार्याचे योग्य नियोजन व्हावे आणि कार्य यशस्वी व्हावे, यांसाठी भगवंताचे अधिष्ठान अन् साधनेची आवश्यकता आहे.
५ अ १. ईश्‍वर भक्ताला साहाय्य करतो, म्हणून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करा ! : दुष्टांकडून भक्तांचा छळ झाला, तरच ईश्‍वर अवतार घेतो; म्हणून आपण साधना करून ईश्‍वराचे भक्त झालो, तरच आपल्याला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्‍वराचे पाठबळ मिळणार आहे.
५ अ २. ‘साधना न करता हिंदु राष्ट्र येईल’, असे समजू नका ! : पराक्रमी असणार्‍या पांडवांनाही कौरवांविरुद्धच्या युद्धात श्रीकृष्णाचे साहाय्य घ्यावे लागले, तर श्रीकृष्ण आणि साधना यांविना ‘आम्ही हिंदु राष्ट्राची स्थापना करू’, असे म्हणणे किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येईल.
५ अ ३. आतंकवादी धर्माचरणी असल्याने त्यांना अल्लाचा आशीर्वाद असतो ! : पाच वेळा नमाज पढणारे, इस्लामी वेशभूषा अभिमानाने करणारे आणि ‘धर्माज्ञा’ म्हणून जिहाद करणारे आतंकवादी इस्लामनुसार कठोर आचरण करतात. त्यामुळे त्यांना अल्लाचा आशीर्वाद असतो. आपल्या इतिहासानुसारही देवता साधना करणार्‍याला त्याच्या साधनेचे फळ म्हणून आशीर्वाद देतात. यामुळे रावण, हिरण्यकश्यपू, भस्मासूर आदी राक्षसांनीही कठोर तप करून देवाकडून वरदान प्राप्त केले होते.
     या तुलनेत आपण हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमी असलो, तरी धर्माचरणी नसतो. त्यामुळे आपल्याला ईश्‍वराचा आशीर्वाद लाभत नाही. जसे एखाद्याचे युवतीवर केवळ प्रेम असून चालत नाही, तर तिच्या प्राप्तीसाठी तिला अपेक्षित प्रत्यक्ष आचरण करावे लागते. राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य केवळ शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर होऊ शकत नाही, तर त्यासाठी धर्मशक्तीचे बळ, म्हणजेच ईश्‍वराचा आशीर्वाद आवश्यक असतो. तो केवळ साधनेने प्राप्त होतो. 
५ अ ४. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने पांडवांप्रमाणे आपणही जिंकू ! : आज भ्रष्टाचारी, आतंकवादी आणि हिंदुद्वेष्टे यांच्या तुलनेत साधना करणारे धर्मप्रेमी अत्यंत अल्प प्रमाणात असले, तरी कौरवांच्या तुलनेत संख्येने अल्प असलेल्या पांडवांप्रमाणे ते श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतील, याची निश्‍चिती बाळगा ! 
५ आ. रज-तमप्रधान आतंकवाद्यांविरुद्ध, तसेच राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही यांवर विजय मिळवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी रज-तमप्रधान युक्त नव्हे, तर साधना करून रज-सत्त्व वा सत्त्व-रज गुणांनी युक्त होणे आवश्यक ! : एका हिंदुत्वनिष्ठाची शंका होती की, आतंकवाद्यांशी संघर्ष करण्यासाठी आम्हाला रज-तमप्रधान गुणांनी युक्त रहावे लागते. आम्ही साधना करून सात्त्विक झालो, तर हिंदुद्वेष्ट्यांचा प्रतिकार कसा करणार ?
     युद्धशास्त्रानुसार शत्रूपेक्षा गुण, पराक्रम आणि शस्त्रसाठा यांत वरचढ असलेले विजयी होतात. रज-तमप्रधान हिंदुद्वेष्ट्यांशी संघर्ष करण्यासाठी रज-तम गुण असूून उपयोगाचे नाही. त्यामुळे विजय मिळणार नाही. रज-तम गुणांशी लढण्यासाठी त्यापेक्षा वरचढ असलेल्या रज-सत्त्व अथवा सत्त्व-रज या गुणांची आवश्यकता असते. हिंदुत्वनिष्ठांमध्ये हे गुण साधना केल्यानेच वाढू शकतात. साधना केल्यानेच व्यक्ती सत्त्वगुणी बनते. हिंदुद्वेेष्ट्यांविरुद्ध जिंकण्यासाठीही हिंदुत्वनिष्ठांनी साधनाच करणे का आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येईल.’ (३.५.२०१४) 
५ इ. साधना केल्यामुळे मिळणार्‍या चैतन्याचे महत्त्व 
१. ‘वाणीत चैतन्य आल्यामुळे बोलण्याचा प्रभाव चांगला होतो. 
२. चैतन्यामुळे शारीरिक क्षमताही वाढते.’ (३.५.२०१४) 
५ ई. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात येणारे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर करण्यासाठी साधनाच हवी ! : ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य हे ईश्‍वरी कार्य असल्याने या कार्याला वातावरणातील अदृश्य अनिष्ट शक्तींचा विरोध हा होतोच. त्यामुळे डोके जड होणे, न सुचणे, कार्यात अडचणी येणे आणि त्यामुळे नैराश्य येणे, असे त्रास होऊ शकतात. हे त्रास न्यून (कमी) व्हावेत आणि कार्य सुरळीत चालू रहावे, यांसाठी साधना करणे हाच एकमेव उपाय असतो.’ (२३.४.२०१२) (क्रमश:) 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’) 
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn