Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आरोप फेटाळले !

काँग्रेसच्या उमेदवाराचे आवेदन बाद करण्यासाठी अधिकार्‍यावर दबाव आणल्याचे प्रकरण !
     मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) - गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक अधिकार्‍यांवर दबाव टाकल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. जानकर यांनी आयोगाला १२ पानी खुलासा पाठवला असून त्यात त्यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. 
     देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार्‍या उमेदवाराने अपक्ष म्हणूनही आवेदन प्रविष्ट केले होते. काँग्रेसकडून प्रविष्ट केलेले आवेदन बाद करून त्या संबंधित उमेदवारास अपक्ष निवडणूक लढवण्याची अनुमती द्यावी आणि कपबशी हे निवडणूक चिन्ह द्यावे, असा दबाव जानकर यांनी निवडणूक अधिकार्‍यांवर टाकला असल्याची तक्रार काँग्रेसने आयोगाकडे केली होती. या संदर्भातील ‘व्हिडिओ’ही वृत्तवाहिन्यांवर दाखवला गेला होता. याची नोंद घेऊन निवडणूक आयोगाने जानकर यांच्याकडून खुलासा मागवला होता.
     या खुलाशात जानकर यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत केवळ आपण निवडणूक अधिकार्‍यांना विनंती केली होती. जो ‘व्हिडिओ व्हायरल’ झाला आहे, त्यात संपूर्ण चित्रीकरण नाही, असा दावा त्यांनी केला आहे. याविषयी गंभीर नोंद घेत राज्य निवडणूक आयोगाने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवला आहे, तसेच संबंधित वृत्तवाहिनीकडून प्रसारित झालेली ध्वनीचित्र चकती मागवली आहे, असे त्यात पुढे म्हटले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn