Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जयललिता यांच्या पार्थिवावर चेन्नईमध्ये अंत्यसंस्कार !

दहन न करता
पार्थिव पुरण्यात आले !
        चेन्नई - ६ डिसेंबरला तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता (वय ६८ वर्षे) यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजता लाखो लोकांच्या उपस्थितीत येथील मरीना समुद्रकिनार्‍यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयललिता यांच्या पार्थिवाचे हिंदु परंपरेनुसार दहन न करता ते येथे पुरण्यात आले. जयललिता यांचे राजकीय मार्गदर्शक आणि माजी मुख्यमंत्री एम्.जी रामचंद्रन् यांच्या स्मारकाशेजारीच जयललिता यांचे पार्थिव पुरण्यात आले. (हिंदु परंपरेचे पालन न करता आणि धर्मशास्त्राच्या विरुद्ध अंत्यसंस्कार केल्यामुळे जिवाला पुढची गती प्राप्त होण्यात अडथळा निर्माण होतो, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे ! - संपादक) प्रकृती खालावल्यामुळे जयललिता यांचे ५ डिसेंबरच्या रात्री साडेअकरा वाजता दीर्घ आजारामुळे निधन झाले. अनुमाने अडीच मास (महिने) त्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या. जयललिता यांच्या निधनानंतर अपोलो रुग्णालयासह संपूर्ण राज्यात प्रचंड बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू, कर्नाटक, केरळ आदी ७ राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्री आणि मान्यवर आले होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही येण्यासाठी निघाले असता त्यांच्या विमानात अचानक तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने ते दुसर्‍या विमानाने येथे दाखल झाले.
        जयललिता यांच्या निधनानिमित्त देशात १ दिवसाचा आणि तमिळनाडूत ७ दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. या काळात सरकारी कार्यालयावरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यात येणार आहे, तसेच कोणत्याही सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. ३ दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. उत्तराखंड, बिहार, कर्नाटक आणि पुद्दूचेरी या राज्यांतही एक दिवसाचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे.
पन्नीरसेल्वम् तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री
        जयललिता यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अत्यंत विश्‍वासू समजले जाणारे आणि अण्णाद्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते ओ. पन्नीरसेल्वम् तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री झाले. ५ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. पन्नीरसेल्वम् यांच्यासमवेत आणखी ३२ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. 
अभिनेत्री ते राजकारण 
        जयललिता राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्री होत्या. त्यांनी कन्नड, तमिळ, इंग्रजी आणि हिंदी भाषांतील अनुमाने ३०० चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. वर्ष १९८२ मध्ये जयललिता यांनी एम्.जी. रामचंद्रन् यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश करत राजकारणाला प्रारंभ केला. वर्ष १९८४ ते १९८९ या कालावधीत त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. वर्ष १९८७ मध्ये रामचंद्रन् यांच्या निधनानंतर जयललिता यांनी स्वत:ला रामचंद्रन् यांचे उत्तराधिकारी घोषित केले. वर्ष १९८९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २७ जागा जिंकून जयललिता यांचा पक्ष विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला. वर्ष १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसशी युती करून त्यांनी सरकार बनवले. त्यानंतर त्या आणखी ५ वेळा राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn