Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एस्आयटीचा चौकशी अहवाल सादर करून दोषींवर कठोर कारवाई करावी ! - शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

श्री. राजेश क्षीरसागर
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती घोटाळ्याचे प्रकरण
श्री. श्रीकांत पिसोळकर
      नागपूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणार्‍या ३ सहस्र ६७ मंदिरांतील घोटाळ्याच्या संदर्भात गेल्या वर्षी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्या वेेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ८ एप्रिल २०१५ या दिवशी या विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा करतांना ६ मासांत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते, प्रत्यक्षात दोषींवर कोणती कारवाई केली त्याचा अहवाल विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) अद्यापही सादर केलेला नाही. दोषींवर कारवाई न केल्याने जुने सदस्य अद्यापही मोकाट फिरत आहेत. यासाठी देवस्थानांच्या जुने सदस्य असलेल्या भ्रष्ट समित्या त्वरित बरखास्त (विसर्जित) करून नवीन सदस्यांची नियुक्ती करावी आणि एस्आयटीने घोटाळा चौकशीचा अहवाल सादर करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी १७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली.
     पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थानाच्या अंतर्गत येणार्‍या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरांसह एकूण ३ सहस्र ६७ मंदिरांतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अन्य भक्त यांनी पुराव्यांसह उजेडात आणला होता. परिणामी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याची विशेष अन्वेषण पथक, तर तुळजापूर देवस्थान समितीच्या घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभाग यांच्याकडून चौकशी चालू झाली; मात्र जाणीवपूर्वक वर्षानुवर्षे या चौकशा लांबवल्या जात आहेत.
     त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता दाट असल्याने भक्तगणांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी आणि देवनिधीच्या चोरीचे पाप भाजप-सेना शासनाला लागू नये, यासाठी शासनाने या सर्व देवस्थानांतील घोटाळ्यांची चौकशी येत्या ३ मासांत पूर्ण करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाने या देवळांतील अपकारभाराचे नैतिक दायित्व स्वीकारून सर्व भ्रष्ट शासकीय देवस्थान समित्या तात्काळ बरखास्त (विसर्जित) कराव्यात, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलनाद्वारे वेळोवेळी केली होती. तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नागपूर विधानभवनाजवळ संतप्त निदर्शने आणि घोषणाबाजी केली होती. 

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn