Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने ब्राह्मतेजाचे (आध्यात्मिक बळाचे) महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !


‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
१. ब्राह्मतेज म्हणजे काय ?
‘ब्राह्मतेज म्हणजे साधना केल्यामुळे निर्माण होणारे आध्यात्मिक बळ ! 
२. ब्राह्मतेजाची आवश्यकता
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे शिवधनुष्य धर्माचरणी हिंदूंना उचलायचे आहे. ‘शिवधनुष्य’ या शब्दाचा उपयोग यासाठी केला की, केवळ बाहूबळाने शिवधनुष्य उचलणे शक्य नसते. त्यासाठी दैवी पाठबळही लागते. केवळ शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर कार्य करून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न करावे लागतील. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेजासह ब्राह्मतेजही (आध्यात्मिक बळही) आवश्यक आहे.
३. ब्राह्मतेजाद्वारे कार्य कसे होते ?
अणूबॉम्बपेक्षा परमाणूबॉम्ब अधिक प्रभावशाली असतो; कारण तो अणूबॉम्बपेक्षा अधिक सूक्ष्म असतो. म्हणजे स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म अधिक सामर्थ्यवान आहे. विविध स्तरांवर कार्य कसे होते, हे लक्षात घेतले की, ब्राह्मतेजाचे सामर्थ्य लक्षात येईल.
३ अ. पंचभौतिक (स्थूल, वैज्ञानिक स्तर) : शत्रू कोठे आहे, हे पंचज्ञानेंद्रियांनी जाणवले, उदा. तो दिसला किंवा त्याची हालचाल जाणवली, तर बंदुकीच्या गोळीने त्याला मारता येईल; मात्र काहीएक हालचाल न करता तो एखाद्या आडोशाच्या मागे लपला, तर बंदूकधारी त्याला मारू शकणार नाही. येथे मारण्यासाठी केवळ स्थूल आयुध वापरले आहे.
३ आ. पंचभौतिक (स्थूल) आणि मंत्र (सूक्ष्म) एकत्रित : पूर्वीच्या काळी मंत्र उच्चारून धनुष्याला लावलेला बाण सोडीत. मंत्रामुळे बाणावर त्या शत्रूच्या नावाची नोंद होई आणि तो आडोशाच्या मागेच काय, तर त्रैलोक्यात कुठेही लपला, तरी बाण त्याचा वध करू शकत असे.
३ इ. मंत्र (सूक्ष्मतर) : पुढच्या टप्प्यात बंदूक, धनुष्यबाण इत्यादी स्थुलातील आयुधांविना नुसत्या विशिष्ट मंत्राने शत्रूला मारता येते.
३ ई. व्यक्त संकल्प (सूक्ष्मतम) : ‘एखादी गोष्ट घडो’, एवढाच विचार एखाद्या गुरूंच्या / संतांच्या मनात आला, तर ती गोष्ट घडते. यापेक्षा अधिक त्यांना दुसरे काहीएक करावे लागत नाही. ७० टक्क्यांहून जास्त आध्यात्मिक पातळी (टीप १) असलेल्या संतांच्या संदर्भात ते शक्य होते.
(टीप १ - सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के आणि मोक्ष म्हणजे १०० टक्के.)
३ उ. अव्यक्त संकल्प (सूक्ष्मातीसूक्ष्म) : यात ‘अमुक एक गोष्ट होवो’, असा संकल्प संतांच्या मनात न येताही, ते कार्य होते. याचे कारण म्हणजे, यामागे संतांचा अव्यक्त संकल्प असतो. ८० टक्क्यांहून जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या संदर्भात ते शक्य होते. 
३ ऊ. अस्तित्व (अती सूक्ष्मातीसूक्ष्म) : या अंतिम टप्प्यात मनात संकल्पही करावा लागत नाही. संतांच्या नुसत्या अस्तित्त्वाने, सान्निध्याने किंवा सत्संगाने ते कार्य होते. ९० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या संतांच्या संदर्भात ते शक्य होते. (क्रमश:) 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’) 
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ हा ग्रंथ ऑनलाइन खरेदी करण्यासाठी ‘सनातन शॉप’च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn