Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नागपूर येथे मराठा-कुणबी समाजाचा भव्य मूक मोर्चा !

     नागपूर - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, नगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात पालट करावे, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा-कुणबी समाजाच्या वतीने १४ डिसेंबर या दिवशी शहरातून शिस्तबद्धपणाने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. 
     विशेष म्हणजे एकीकडे मूक मोर्चा निघाला असतांना दुसरीकडे विधान परिषदेत मराठा आरक्षणावरील चर्चा चालू होती. सत्ताधारी पक्षांसोबत विरोधकांनी मोर्च्यात सहभाग घेतला. यावरून त्यांत श्रेयासाठी लढाई चालू असल्याचे चित्र दिसून आले. 

     मोर्च्यातील मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. "आम्ही प्रथमच राजकीय नेत्यांकडे आलो आहोत. मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या, अन्यथा 'बुलेट'ऐवजी 'बॅलेट'मधून शासनाला उत्तर मिळेल", अशी चेतावणी त्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली. 
  कोपर्डी बलात्कार प्रकरणाची २० डिसेंबरपासून सुनावणी ! - मुख्यमंत्री 
     आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, "तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवले जाणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देणे ही संविधानिक प्रक्रिया आहे. त्याविषयी राज्य शासनही अनुकूल आहे. मराठा आरक्षण भावनेचा विषय नसून तो कायद्याचा भाग आहे. कोपर्डी बलात्काराची घटना अत्यंत निंदनीय आहे. याप्रकरणी २० डिसेंबरपासून प्रतीदिन सुनावणी होईल. तसेच अ‍ॅट्रोसिटीचा दुरुपयोग टाळण्यासाठी शासन अभ्यास करत आहे. विविध कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा केली जात आहे."
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn