Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कु. दीपाली मतकर रुग्णाईत असतांना तिला साहाय्य करतांना लक्षात आलेली सूत्रे

कु. दीपाली मतकर
१. दीपालताईला रुग्णालयात नेतांना ‘ती पुष्कळ
अशक्त झाली आहे’, असे वाटणे, रुग्णालयातील आधुनिक
वैद्य न भेटल्याने तिला साधिका-आधुनिक वैद्या
(सौ.) काटोटे यांच्याकडे सलाईन लावणे आणि तिचे रक्त तपासणीसाठी देणे 
    ‘२२.१०.२०१६ या दिवशी सकाळी मला समजले, ‘दीपालीताईला ताप आला आहे आणि तिला घेऊन रुग्णालयात जायचे आहे.’ मी सेवाकेंद्रात गेल्यावर ‘ताई पुष्कळ अशक्त झाली आहे’, असे वाटत होते. आम्ही चारचाकीतून रुग्णालयात गेल्यावर आधुनिक वैद्य गावी गेले असल्याने आमचा एकाही आधुनिक वैद्याशी संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा दीपालीला साधिका-आधुनिक वैद्या (सौ.) काटोटे यांच्याकडे सलाईन लावले आणि तिचे रक्त तपासणीसाठी दिले. त्यानंतर मी कार्यशाळेच्या सेवेला गेले.

२. डेंग्यू झाल्याने अतीदक्षता विभागात ठेवलेल्या दीपालीताईला पाहून भीती वाटणे,
‘तिचे काही खरे नाही’, असा विचार मनात येणे आणि त्यामुळे तिला सूक्ष्मातून
गुरुदेवांच्या चरणांजवळ ठेवून ‘तुमच्या या बाळाला तुम्हीच सांभाळा’, अशी प्रार्थना करणे 
    दुसर्‍या दिवशी ‘दीपालीताईला डेंग्यू झाल्याने तिला रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवले आहे’, असे समजले. मी तेथे गेल्यावर आधी ज्या आधुनिक वैद्यांनी ताईला तपासले होते, त्यांची भेट झाली नाही. तेव्हा मला वाटले, ‘हा अडथळाच आहे.’ तेव्हा माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘गुरुदेवा, आधुनिक वैद्य भेटू दे.’ मी ताईला सूक्ष्मातून गुरुदेवांच्या चरणांजवळ ठेवून ‘तुमच्या या बाळाला तुम्हीच सांभाळा’, अशी प्रार्थना केली. मला अतीदक्षता विभागात ठेवलेल्या ताईला पाहून भीती वाटत होती. ‘ताईचे काही खरे नाही’, असा विचार तेव्हा माझ्या मनात आला.
३. दीपालीताईच्या संदर्भात ‘सुर-असुर यांचे सूक्ष्मातील युद्ध चालू आहे’,
असा विचार मनात येणे, तिच्यावर आध्यात्मिक उपाय चालू झाल्यावर तिची
स्थिती स्थिर होऊ लागणे, ‘सद्गुरु बिंदाताई दीपालीला मिठी मारत आहेत’
आणि ‘प.पू. डॉक्टर तिच्या शेजारी आसंदीत (खुर्चीत) बसले आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे
ताईवर आध्यात्मिक उपाय चालू झाल्यावर तिची स्थिती स्थिर व्हायला लागली. तिच्यावर गहू आणि गवत यांचे आध्यात्मिक उपाय चालू असतांना ताईची स्थिती चांगली वाटायची; परंतु नंतर पुन्हा ती गंभीर व्हायची. मला ‘सद्गुरु बिंदाताई दीपालीला मिठी मारत आहेत’, असे दिसले. तसेच ‘प.पू. डॉक्टर ताईच्या शेजारी आसंदीत (खुर्चीत) बसले आहेत’, असे दिसले. ‘सुर-असुर यांचे सूक्ष्मातील युद्ध चालू आहे’, असा विचारही मनात यायचा. शेवटी देवानेच जिंकवले.
४. दीपालीताईची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
४ अ. दुसर्‍यांचा सतत विचार : ताईची स्थिती कितीही गंभीर असली, तरी ती साधकांना ‘तुम्ही जेवलात का ? तुम्हाला त्रास होत नाही ना ?’, असे विचारायची.
४ आ. स्वावलंबी : तिला शक्य असेल तेवढे ती स्वतःचे स्वत: आवरायची.
४ इ. व्यवस्थितपणा : ती अतीदक्षता विभागात असतांनाही सतर्क आणि नीटनेटकी असायची. ती पाणी प्यायलेले फुलपात्र बाटलीवर पालथे घालायची. साधकांना हात धुवायला सांगायची.
४ ई. समष्टी सेवेचा विचार
१. ती सांगायची, ‘साधकांचा समष्टी सेवेचा वेळ वाया जात असल्याने त्यांनी भेटायला येऊ नये.’ ताई रुग्णालयातही तत्त्वनिष्ठ असायची.
२. ताई मृत्यूच्या दारात असूनही स्थिर राहून साधक आणि समष्टी सेवा यांचा विचार करायची.
४ उ. ताई संत मीराबाईच वाटणे : ‘ताई संत मीराबाईच आहे’, असे वाटायचे. ती कडू औषध ‘अमृत आहे’, असे समजून घ्यायची.
५. साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
५ अ. दीपालीताईचे वडील श्री. मतकरकाका : काका साक्षीभावाने रहायचे. ते रुग्णालयात भ्रमणभाषवरून भजने ऐकायचे. कुणी साधकाने काही सांगितल्यावर लगेच ‘हो’ म्हणायचे. तसेच ते चुका स्पष्टपणे सांगायचे.
५ आ. दीपालीताईचे भाऊ श्री. नीलेशदादा : ते शांत होते. त्यांची गुुरुदेवांवर श्रद्धा दिसून येत होती. ते म्हणायचे, ‘गुरुदेवच तिची काळजी घेणार आहेत.’
५ इ. अन्य साधक
५ इ १. श्री. डहाळेमामा : मामा प्रत्येक कृती शांततेने आणि स्थिर राहून करायचे.
५ इ २. सौ. जठारकाकू : काकू या कठीण प्रसंगात स्थिर राहून परिस्थिती हाताळत होत्या. एकाच दिवशी ताईचे आजारपण, कार्यशाळा आणि हिंदु धर्मजागृती सभेसाठीच्या बैठका चालू होत्या. तेवढ्या गंभीर स्थितीतही त्या शांतपणे निर्णय घेत होत्या.
मी पुस्तकात वाचले होते, ‘भक्त मृत्यूलाही जिंकू शकतो.’ दीपालीताईच्या उदाहरणावरून देवाने ते या घोर आपत्काळात प्रत्यक्ष अनुभवायला दिले. ‘हे श्रीकृष्णा, तुला अपेक्षित असे माझ्याकडून जे काही तू करवून घेतलेस, ते तू माझ्याकडून लिहून घेतलेस. यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे !’
- श्रीमती वीणा साखरे, सोलापूर
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn