Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार थांबवा ! - हिंदु धर्माभिमानी

बेंगळुरू (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी
     बेंगळुरू - बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील टाऊन हॉल येथे ११ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयंत, श्रीराम सेनेचे श्री. प्रितेश, सनातन संस्थेच्या सौ. गायत्री राव, हिंदुत्वनिष्ठ श्री. व्यंकटस्वामी रेड्डी यांनी आंदोलनाला संबोधित केले. या वेळी त्यांनी ‘बांगलादेशी हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशी सरकारवर दबाव आणला पाहिजे. अन्यथा येत्या ३० वर्षांत बांगलादेशात एकही हिंदु शिल्लक रहाणार नाही’, असे प्रतिपादन केले. या वेळी विविध संघटनांचे अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn