Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सिरियाला जाण्याच्या विचारात होते सिमीचे आतंकवादी !

भोपाळ येथे चकमकीत ठार झालेल्या सिमीच्या आतंकवाद्यांचे प्रकरण 

सिमीचे आतंकवादी चकमकीत ठार झाल्यानंतर 
गळा काढणार्‍या कथित मानवतावाद्यांना काय म्हणायचे आहे ? 
आतंकवादग्रस्त भारत ! 
     भोपाळ - भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पलायन करतांना चकमकीत मारल्या गेलेल्या सिमीच्या आतंकवाद्यांचे इसिसमध्ये सहभागी होण्याचे नियोजन होते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेच्या अन्वेषणात समोर आली आहे. हे आतंकवादी कारागृहातून पळून जात असतांना पोलिसांनी त्यांना काही घंट्याच्या आतच चकमकीत ठार मारले होते. 
     इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरियाला जाण्याविषयी या आतंकवाद्यांनी कारागृहातील इतर कैद्यांशीही चर्चा केली होती. या कारागृह पलायनचा मुख्य सूत्रधार अबू फैजल होता. अटक होण्याच्या पूर्वी तो पाकिस्तानला जाण्याच्या विचारात होता. त्याने उत्तरप्रदेशातही त्याचे जाळे निर्माण केले होते. या जाळ्याच्या माध्यमातून बनावट पासपोर्ट सिद्ध करून त्यांचा नेपाळ मार्गे सिरिया गाठण्याचा बेत होता.
सिमीच्या आतंकवाद्यांनी सोने लुटून केले बॉम्बस्फोट ! 
     सिमीच्या आतंकवाद्यांनी ऑगस्ट२०१० मध्ये भोपाळच्या मणप्पुरम् गोल्ड फायनान्स कंपनीतून लूटलेल्या सोन्याच्या पैशातून पाटणा आणि बोधगया येथे बॉम्बस्फोट केले होते. या दरोड्यातून सिमी आतंकवाद्यांनी अबू फैजलसह १२ किलो सोने लूटले होते. यांतील केवळ ६ किलो सोने पोलीस कह्यात घेऊ शकले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn