Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) आम्ही भारतासमवेत नेहमीच शत्रुत्व घेऊन जगू शकत नाही !

पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा साळसूदपणा !
पाकला जर खरंच असे वाटत असेल, तर त्याने प्रथम पाकमधील आतंकवाद्यांचा
निःपात करावा आणि प्रतिदिन सीमेवरील गोळीबार अन् घुसखोरी थांबवावी. 
एवढे जरी त्याने प्रत्यक्षात करून दाखवले, तरी शत्रुत्व संपण्यास प्रारंभ होईल !
     नवी देहली - आम्ही नेहमीच भारतासमवेत शत्रुत्व पत्करून राहू शकत नाही. ७० वर्षे आम्ही वाया घालवली आहेत. आता वेळ आली आहे की, दोन्ही शेजार्‍यांनी ठरवले पाहिजे की, आम्हाला याच परिस्थितीत रहायचे कि नवीन प्रारंभ करायचा, असे विधान भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केले आहे. एका चर्चेच्या वेळी त्यांनी हे विधान केले. चर्चेसाठी पाक सिद्ध आहे; मात्र भारताकडून यावर सहकार्य मिळतांना दिसत नाही, असा कांगावाही त्यांनी या वेळी केला. (पाकने अनेकदा भारतावर आक्रमण करूनही भारत सरकारने सातत्याने मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी का होईना पाकशी चर्चा केली आहे. तरीही पाक असा कांगावा करत आहे, यावरून त्याचा हेतू लक्षात येतो ! - संपादक)      बासित पुढे म्हणाले की, दोन्ही देशांनी आपापसांतील मतभेद दूर केले पाहिजेत, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढीस लागून कोणत्याही अडचणींविना पुढे जाता येईल. आमचे सरकार धैर्यशील आहे आणि ते चर्चेला प्रारंभ होण्याची वाट पाहू शकते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn