Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया राबवून ईश्‍वराशी एकरूप होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे ऑस्ट्रेलिया येथील श्री. सिमॉन !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या
शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती 
श्री. सिमॉन
श्री. सिमॉन हे ऑस्ट्रेलिया येथील असून गेले ६ मास (महिने) ते एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते ‘लेव्हल २’ सत्संगाला उपस्थित रहातात. श्री. सिमॉन स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवत असून त्यासाठी ते तळमळीने प्रयत्न करतात. त्यांच्याकडे एस्.एस्.आर्.एफ्.ची ऑनलाइन ‘एस.इ.ओ’ सेवा आहे. काही काळापूर्वी त्यांनी ‘साधनेसाठी अधिक वेळ मिळावा’, यासाठी त्यांनी पूर्णवेळ असलेली चाकरी सोडली आहे. सध्या ते अर्धवेळ चाकरी करतात. या कार्यशाळेत ते उत्साहाने सहभागी असून येथे उपस्थित रहायला मिळाल्यामुळे त्यांना कृतज्ञता वाटत आहे. त्यांचा साधनाप्रवास आणि कार्यशाळेच्या कालावधीत त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. साधनाप्रवास
१ अ. ईश्‍वर (जीझस) हा सूडभावनेने वागणारा असून ‘आपल्या हातून काही चुका घडल्या, तर तो शिक्षा करतो’, असे शिकवण्यात येणे आणि माहितीजालावर (इंटरनेट) अध्यात्मशास्त्राविषयी माहितीचे वाचन केल्यामुळे ‘ईश्‍वर म्हणजे प्रीती आहे’, हे समजल्यावर आश्‍चर्य वाटणे : ‘ईश्‍वर (जीझस) हा सूडभावनेने वागणारा असून ‘आपल्या हातून काही चुका घडल्या, तर तो शिक्षा करतो’, असे मला शिकवण्यात आले होते. वयाच्या १७ व्या वर्षी मला ‘मेक्सिकन भारतीय आणि सूक्ष्मातील संकल्पना’ याविषयी एक ग्रंथ मिळाला. तो वाचल्याने माझी जिज्ञासा जागृत झाली आणि मी प्राणायामाचे ज्ञान मिळवून देहाच्या बाहेर रहाण्याच्या अनुभूती घेतल्या. त्यानंतर मी चाकरी करायला आरंभ केला; पण वय होऊ लागले तसतसे मला पूर्वीच्या अनुभूती आठवू लागल्याने मी माहितीजालावर (इंटरनेटवर) अध्यात्मशास्त्राविषयी माहिती मिळवण्यास आरंभ केला. या वाचनामुळे ‘ईश्‍वर म्हणजे प्रीती’, हे समजल्याने मला आश्‍चर्य वाटले. १ आ. ‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करणे’, या उद्देशाने कार्यशाळेत सहभागी होणे आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी जाणून घेण्याविषयी जिज्ञासा असणे : मी अध्यात्माविषयी मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्थांचे सभासदत्व स्वीकारले; पण ‘या सगळ्या संस्थांतून अहंला खतपाणी घातले जाते’, असे मला जाणवले. ‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करणे’, या उद्देशाने मी या कार्यशाळेला आलो आहे. ‘लोकांना त्यांचे मूळ आध्यात्मिक स्वरूप कळावे’, असेही मला वाटते. स्वतःचे दोष जाणून घेऊन त्याचे निर्मूलन करण्यास साहाय्य करणार्‍या स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी आणि साधनेच्या इतर अंगाविषयी मला अधिक जाणून घ्यायचे आहे.
२. कार्यशाळेच्या कालावधीत आलेल्या अनुभूती
२ अ. एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘स्काईप’ सत्संगात पहिल्यांदा भावाची अनुभूती येणे आणि त्यानंतर पुष्कळ शक्ती आल्याचे जाणवणे : ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘स्काईप’ सत्संगाला उपस्थित असतांना मला पहिल्यांदा भावाची अनुभूती आली. या वेळी मला आनंदाने भरून आले आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. या अनुभूतीनंतर माझ्यात पुष्कळ शक्ती आली असून ‘मी आता गाडी ओढू शकेन’, असे वाटले. त्या रात्री मी पूर्णवेळ जागा होतो. मी एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ आणि आध्यात्मिक साहित्य वाचत होतो. त्या वेळी ‘मी चंद्रावर उडी मारून जाऊ शकेन, इतकी ऊर्जा माझ्यात आली आहे’, असे मला जाणवत होते.
२ आ. आश्रमात आल्यावर पहिल्या पहाटे एका स्वभावदोषाची जाणीव होणे आणि त्या वेळी भावजागृती होऊन आनंद होणे : येथे आल्यावर पहिल्या पहाटे माझ्यातील एका स्वभावदोषाची जाणीव होऊन मला जाग आली. कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी माझ्यातील हा दोष माझ्या लक्षात आला होता. हा दोष वरवर पहाता साधा दिसत असला, तरी त्यामुळे माझ्या आयुष्यावर किती परिणाम होत आहे अन् माझ्यातील इतर दोषांचे मूळही हाच दोष असल्याचे माझ्या लक्षात आले. या वेळी माझी भावजागृती होऊन माझे डोळे भरून आले. या जाणिवेमुळे मला आनंदही झाला.
२ इ. कार्यशाळेच्या दुसर्‍या पहाटे आयुष्यावर सखोल परिणाम करणार्‍या स्वभावदोषाची जाणीव होऊन आनंददायी भावस्थितीची अनुभूती येणे आणि सकारात्मक ऊर्जेची स्पंदने जाणवून अधिक अंतर्मुख होणे : एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘स्काईप’ सत्संगाला उपस्थित रहाण्यासाठी मी पुष्कळ गोष्टींचा त्याग केला आहे. मी इथे आल्यावर ‘स्काईप’ सत्संगाच्या तुलनेत मला पुष्कळ अधिक मिळाले आहे. एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या दुसर्‍या पहाटे ‘माझ्यातील साध्या वाटणार्‍या स्भावदोषाचे माझ्या आयुष्यावर किती सखोल परिणाम होत आहेत’, याची मला जाणीव झाली अन् एका आनंददायी भावस्थितीची अनुभूती आली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि माझ्या भोवती सकारात्मक ऊर्जेची स्पंदने जाणवली. यामुळे मी अंतर्मनातील संस्काराविषयी अधिक अंतर्मुख झालो.
२ ई. प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र आणि शंकराचे चित्र यांत हालचाल जाणवणे आणि आश्रमाच्या इमारतीमधून बाहेर पडणार्‍या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती येणे : त्या दिवसानंतर मला पुष्कळ आध्यात्मिक घटना पहावयास मिळाल्या. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि शंकराचे चित्र यांत मला हालचाल जाणवली. आश्रमाच्या इमारतीमधून बाहेर पडणार्‍या सकारात्मक ऊर्जेची मला अनुभूती आली. माझ्या शरिराला आनंददायक आणि सुखद संवेदना जाणवत होत्या आणि ‘मी आश्रमाच्या भितींत विरघळून जात आहे’, असे मला वाटले. मी एक लहान आनंदी साधक आहे. देवा, तुझ्या चरणी कृतज्ञता !
३. जाणवलेले सूत्र
३ अ. सत्र संपल्यावर सर्व उपस्थित एकमेकांशी बोलत असतांना एका मोठ्या प्रेमळ कुटुंबाचे सदस्य असल्याचे वाटणे : ११.१२.२०१६ या दिवशी सत्र संपल्यावर सर्व शिबिरार्थी एका खोलीत गेलो. तिथे पुष्कळ साधक बसले होते. तिथे बसून काहीजण स्वतःचे दोष आणि अनुभूती लिहित होते, तर काहीजण सूक्ष्मातील प्रयोग करत होते. सगळेजण उत्साहाने एकमेकांना कार्यशाळेत शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभूती सांगत होते. मी या सगळ्यांना गेले काही दिवस ओळखत असलो, तरी ‘आम्ही सगळेजण एका मोठ्या प्रेमळ कुटुंबाचे सदस्य आहोत’, असे मला वाटले.’ - श्री. सिमॉन, ऑस्ट्रेलिया
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn