Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन’च्या प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा

पू. मिलुटीन पांक्रात्स
४ ई. वाचकांना आलेली अनुभूती आणि 
त्यांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
४ ई १. ‘एस्.एस्.आर्.एफ्.फेसबूक’(इंग्रजी) वरील जिज्ञासूला आलेली अनुभूती - ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने शारीरिक आणि मानसिक पालट जाणवणे : ‘मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला आरंभ केला आहे. काल मी आपल्या संकेतस्थळावरून हा नामजप ‘डाऊनलोड’ करून तो लावून त्याच्यासमवेत नामजप केला. हा जप अत्यंत प्रभावी असून त्यामुळे माझ्यात शारीरिक आणि मानसिक पालट जाणवत आहेत. हा जप विनामूल्य उपलब्ध करून दिल्याविषयी आपले मनःपूर्वक आभार !’ श्रीमती क्रिस्टीन वूड, अमेरिका
४ ई २. आध्यात्मिक संशोधन करून काढलेले निष्कर्ष विस्तृृत, सुस्पष्ट आणि सर्वांना साहाय्यक होतील, अशा प्रकारे प्रकाशित केल्याविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाचे मनःपूर्वक आभार ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील लेख अत्यंत लाभदायक आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ तुम्हीच आध्यात्मिक संशोधन करून त्यावरून काढलेले निष्कर्ष विस्तृत, सुस्पष्ट आणि सर्वांना साहाय्यक होतील, अशा प्रकारे प्रकाशित करता. तुमच्या संकेतस्थळाचे मनःपूर्वक आभार ! मी ६ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाच्या संपर्कात आले. मी त्यावरील सर्व लेख आणि ‘ब्लॉग’ वाचले आहेत. एस्.एस्.आर्.एफ्.चे फेसबूक पेज पाहून मला आनंद झाला. ते नेहमी अद्ययावत केलेले असतेे. सर्वसाधारणपणे तुमच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणारी आध्यात्मिक सूत्रे मला ठाऊक आहेत; पण मी रहात असलेल्या ठिकाणच्या लोकांना मी काही सांगायला गेल्यास त्यांचा त्यावर विश्‍वास बसत नाही. त्यामुळे आध्यात्मिक सूत्रे समजणारी तुमच्यासारखी माणसे मला मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे.’
- श्रीमती बार्बारा आर्. क्लेमर्स 
४ ई ३. फेसबूक (इंडोनेशियन) - ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप भारतीय असला, तरी त्याची परिणामकारकता अधिक महत्त्वाची ! : ‘मी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला आरंभ केला आहे. हा नामजप एखाद्या उपचाराप्रमाणे कार्य करतो. हा जप भारतीय असला, तरी त्याची परिणामकारकता अधिक महत्त्वाची आहे. धन्यवाद’ ! - श्री. झैनल विजय 
४ ई ४. एस्.एस्.आर्.एफ्.(यू-ट्यूब) - एस्.एस्.आर्.एफ्.मुळे मला नामजपाचे महत्त्व कळाले ! : ‘मी करत असलेल्या नामजपात दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. जसजसा काळ जात आहे, तसतसा या नामजपातील अर्थ मला समजू लागला आहे. कित्येकदा मी विशेष प्रयत्न न करताही ‘माझा नामजप आतून होत आहे’, असे मला जाणवते. मी यापूर्वी नामजप केला नसल्यामुळे मला त्रास झाला असल्याचे आता माझ्या लक्षात येत आहे; मात्र तो आता उणावत असल्याने काळजी नाही. ‘नामजप करणे’ हे माझ्यासाठी नवीन होते. एस्.एस्.आर्.एफ्.करत असलेल्या अनमोल कार्यासाठी मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. ‘साधना करणे’ हा एक अद्भुत अनुभव आहे. तुम्ही जे मार्गदर्शन करत आहात, त्यासाठी मी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही प्रकाशित केलेले सर्व लेख मी वाचले आहेत. मी जन्माने ख्रिस्ती असून त्याच वातावरणात वाढलो असल्यामुळे तुम्ही प्रकाशित केलेले आध्यात्मिक ज्ञान समजून घेणे, हे मला एखादे कडू औषध असल्यासारखे वाटते. आमच्या धर्मातील ‘ईश्‍वर सगळ्या पापांना क्षमा करतो’, या संकल्पनेला नवीन दृष्टीकोन मिळाला आहे.’ 
- श्री. कर्टिस जिया अ‍ॅडम्स 
५. ‘लॉग-इन’ सुविधा 
५ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन’ सुविधा : या सुविधेच्या अंतर्गत सप्टेंबर २०१६ मध्ये इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, सर्बियन, क्रोऐशियन, स्पॅनिश, इंडोनेशियन आणि फारसी या ८ भाषांतील वाचकांच्या ३६८ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली.
५ अ १. जिज्ञासूंनी केला साधनेला आरंभ ! : सप्टेंबर २०१६ मध्ये संपर्कात आलेल्या १६ जिज्ञासूंनी नामजप आणि आध्यात्मिक उपाय यांच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला. ३ नवीन जिज्ञासूंनी फारसी, स्पॅनिश आणि इंडोनेशियन या भाषांतील प्रश्‍नांना उत्तरे देण्यास प्रारंभ केला आहे. 
५ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन’ सुविधा : या अंतर्गत सप्टेंबर २०१६ मध्ये एकूण ३४९ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली. १३ नवीन जिज्ञासूंनी नियमितपणे नामजप करायला आरंभ केला आहे. भारत आणि विदेश (अब्रॉड) या दोन्ही ‘लॉग-इन’सुविधांच्या अंतर्गत सप्टेंबर २०१६ मध्ये एकूण ७१७ प्रश्‍नांना उत्तरे देण्यात आली.
५ इ. ‘लॉग-इन’च्या माध्यमातून मिळालेले वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
५ इ १. अध्यात्माची आवड असणारे आणि आध्यात्मिक उन्नतीचे महत्त्व जाणणारे यांना साहाय्य करण्यासाठी एस्.एस्.आर्.एफ्. पुष्कळ चांगले कार्य करत आहे ! : ‘मला अध्यात्माविषयी लिखाण वाचायला पुष्कळ आवडते. मी गरुडपुराण, नारदनीती आणि व्यासनीती यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे वाचन केले असून ते मी पुनःपुन्हा वाचते. मी पुराणे आणि उपनिषद यांचे वाचनही केले आहे. ‘एखादी गोष्ट का करू नये ?’, याचे उत्तम विश्‍लेषण एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर दिलेले असते. आपल्या पुराणात ‘काही गोष्टी करू नयेत’, असे दिलेले आहे; पण त्याचे स्पष्टीकरण त्यात नसते. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर या मागची कारणमीमांसा उत्कृष्टपणे दिलेली आहे. याच कारणासाठी मी तुमच्या संकेतस्थळाकडे आकृष्ट झाले. अध्यात्माची आवड असणारे आणि आध्यात्मिक उन्नतीचे महत्त्व जाणणारे यांना साहाय्य करण्यासाठी एस्.एस्.आर्.एफ्. पुष्कळ चांगले कार्य करत आहे. संकेतस्थळावरील मार्गदर्शनानुसार मी नामजपाला आरंभ केला आहे. नामजपाला आरंभ केल्यानंतर केवळ ३ आठवड्यांत माझ्या पुष्कळ समस्या न्यून झाल्या आहेत. मी एस्.एस्.आर्.एफ्.चे मनःपूर्वक आभार मानते.’ श्रीमती सुभद्रा शंकर, सिकंदराबाद 
५ इ २. अनेक ढोंगी लोक धर्माच्या नावाने लोकांना अक्षरशः लुटत असतांना एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ सर्व सेवा विनामूल्य देत असलेले पाहून आनंद होतो ! : ‘तुमचे संकेतस्थळ सर्व सेवा विनामूल्य देते. हा भाग मला पुष्कळ आवडतो. आजकाल अध्यात्मशास्त्र हा एक विनोद बनला असून या क्षेत्रात अनेक ढोंगी लोक धर्माच्या नावाने लोकांना अक्षरशः लुटत आहेत. अशा परिस्थितीत ‘मी तुमचे संकेतस्थळ आणि मार्गदर्शक यांवर विश्‍वास ठेवू शकत आहे’, याचा मला आनंद वाटतो.’ - कु. मनविन आर्, मुंबई 
५ इ ३. आलेली अनुभूती - ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हे जप करतांना पुष्कळ आनंद अन् शांती मिळणे : ‘नमस्कार. आपण करत असलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक आभार ! मी प्रतिदिन ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हे जप अर्धा घंटा बसून करत आहे. त्या वेळी मला पुष्कळ आनंद आणि शांती मिळते. मी दिवसभर कामे करतांना नामजप करतोे. श्रीकृष्णाने दाखवलेल्या या साधनामार्गासाठी मी त्याच्या चरणी कृतज्ञ आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि एस्.एस्.आर्.एफ्. करत असलेल्या कार्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. ‘या जगात आपण सर्व जण एकाच कालखंडात जन्माला आलो, हे माझे भाग्य आहे’, असे मला वाटते.’ - श्री. के. केव्हिलन करूपिआह, मलेशिया 
६. विभागात घेण्यात आलेल्या प्रवचनांची संख्या (सप्टेंबर २०१६)
६ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेली व्याख्याने आणि कार्यशाळा यांतील वैशिष्ट्यपूर्ण घटना 
६ अ १. एशिया पॅसिफिक 
६ अ १ अ. सिंगापूर : सौ. श्‍वेता क्लार्क यांनी सिंगापूर येथे पुढील ३ सार्वजनिक प्रवचने घेतली. 
६ अ १ अ १. ‘पूर्वज’ आणि ‘स्वभावदोष-निर्मूलन’ या विषयांवर मार्गदर्शन : १.९.२०१६ या दिवशी श्रीमती हिरवा पोटा यांनी एक प्रवचन आयोजित केले होते. (श्रीमती पोटा यांचा येथील विविध संघटनांशी घनिष्ट संबंध असून त्या भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीय आहेत.) या वेळी ‘पूर्वज’ आणि ‘स्वभावदोष-निर्मूलन’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रवचनाला ४० जिज्ञासू उपस्थित होते. उपस्थितांनी पूर्वज, दैवी कण, स्वभावदोष-निर्मूलन आणि आध्यात्मिक पातळी यांविषयी अनेक शंका विचारून घेतल्या. लोकांनी दत्ताच्या जपाच्या ध्वनीफितीची मागणी केली. एका महिला जिज्ञासूने एस्.एस्.आर्.एफ्.मध्ये नावनोंदणी करून ५ दिवसीय कार्यशाळेला येण्याची सिद्धता दर्शवली. 
६ अ १ अ २. ‘स्वभावदोष-निर्मूलन’ या विषयावरील प्रवचन : ३.९.२०१६ या दिवशी ‘स्वभावदोष-निर्मूलन’ या विषयावर ३ घंट्यांचे प्रवचन घेण्यात आले. याला ६ जिज्ञासू उपस्थित होते. यांपैकी ५ जण एस्.एस्.आर्.एफ्.च्या आधीच्या प्रवचनाला उपस्थित होते. या वेळी श्री. राज हे नवीन जिज्ञासू आले होते. ते ‘हीलर’ (अध्यात्मिक उपाय करणारे) आहेत.
६ अ १ अ ३. ‘आध्यात्मिक उपाय’ या विषयावर प्रवचन : ६.९.२०१६ या दिवशी ‘आध्यात्मिक उपाय’ या विषयावर मुनीश्‍वरन् मंदिरात प्रवचन घेण्यात आले. या वेळी २२ जिज्ञासू उपस्थित होते. यांतील २० जण नवीन असून दोन जिज्ञासू फार पूर्वीपासून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणारे आहे. त्यांना एस्.एस्.आर्.एफ्.चे प्रवचन ऐकण्याची पुष्कळ इच्छा होती. त्या दिवशी ते दोघे सहजच मंदिरात आले होते आणि तिथे त्यांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने प्रवचन असल्याचे कळल्यावर चांगले वाटले. 
     श्री. ख्रिस या चिनी जिज्ञासूंना ‘लेव्हल २’ सत्संगाला उपस्थित रहाण्याची इच्छा आहे. या मंदिराचे अध्यक्षही या व्याख्यानाला उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमस्थळी सेवा केली आणि सर्व उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था केली. 
६ अ १ आ. इंडोनेशिया : सप्टेंबरमध्ये बांडूंग येथे १ आणि बाली येथे २ सार्वजनिक प्रवचने आयोजित करण्यात आली होती. 
अ १ आ १. ‘संकेतस्थळ वाचून साधना करण्याची प्रेरणा मिळाली’, असे सांगणारे प्रवचनाला उपस्थित असणारे श्री. त्रिस्ना ! : देनपसार, बाली येथील प्रवचन आनंददायी वातावरणात पार पडले. उपस्थितांनी प्रवचनाच्या वेळी आणि नंतर थांबून पुष्कळ शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले. या वेळी उपस्थित असलेले हॉटेलचे व्यवस्थापक (मॅनेजर) श्री. त्रिस्ना यांनी अलीकडेच संकेतस्थळावरील अनेक लेख वाचले असून त्यांनी ‘इव्हेंटब्राइट’च्या माध्यमातून स्वतःचे नाव या प्रवचनासाठी नोंदवले होेते. ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर अध्यात्मशास्त्र सोपे करून सांगण्यात आले आहे. ते वाचून पुढे अधिक साधना करण्याची प्रेरणा मिळाली’, असे त्यांनी सांगितले. ‘बाली आणि इंडोनेशिया येथे सर्वसाधारणपणे ‘अध्यात्मशास्त्र’ हे एक गूढ शास्त्र असल्याचा अपसमज आहे; पण एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरून ‘अध्यात्मशास्त्र म्हणजे काय ?’, याविषयी स्पष्टपणे सांगितले असून त्याविषयी मार्गदर्शन केले आहे’, असेही त्यांनी सांगितले. देनपसार येथे सर्व जण प्रवचनानंतरही पुष्कळ वेळ थांबले होते. या वेळचे उपस्थित चांगले वाटले. 
६ अ १ आ २. प्रवचनाच्या पूर्वी आणि नंतर अनेक अडथळे आले, तरी प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्यावर मात करू शकणे आणि नवीन सूत्रे शिकायला मिळणे : बेडुगुल येथील प्रवचनाला उपस्थित असणार्‍या एका जिज्ञासूने ताम्ब्लिंगन, बाली येथील प्रवचनासाठी आम्हाला निमंत्रित केले. तळ्याच्या काठी असणार्‍या एका मंदिरात हे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रवचनाच्या पूर्वी आणि नंतर अनेक अडथळे आले; पण प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आम्ही त्यांच्यावर मात करू शकलो. या वेळी आम्हाला पुष्कळ नवीन सूत्रे शिकायला मिळाली. उपस्थितांनी प्रवचन लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांना दत्ताचा जप आवडला. 
६ अ १ आ ३. प्रवचनात मीठ-पाण्याचे उपाय आणि दत्ताचा जप यांमुळे त्वचारोग बरा झाल्याच्या संदर्भात चलत्चित्र दाखवण्यात येणे आणि हॉटेलच्या मालकांना तसाच आजार असल्याने प्रवचनाला ईश्‍वरानेच बोलावले असल्याची त्यांना अनुभूती येणे : बांडूंग येथे प्रवचनापूर्वी कार्यस्थळाची अनिश्‍चतता आणि प्रचंड पाऊस, असे अडथळे आले, तरीही हे प्रवचन चांगले झाले. या वेळी आम्हाला एक चांगली अनुभूती आली. हे व्याख्यान आयोजित केलेल्या हॉटेलचे मालक जॉन या व्याख्यानाला उपस्थित होते. प्रवचनात मीठ-पाण्याचे उपाय आणि दत्ताचा जप यांमुळे एक्झिमा/सोरायसिस या त्वचारोगाने ग्रस्त असलेले जॉन यांना केवळ ५ दिवसांत त्यांचा रोग उणावल्याची अनुभूती अंतर्भूत असलेले एक चलत्चित्र दाखवण्यात आले होते. ते पाहून त्या हॉटेलच्या मालकांनाही तसाच आजार असल्याने त्यांनी त्याविषयी पुष्कळ जिज्ञासा दाखवली. ‘या प्रवचनाला ईश्‍वरानेच मला बोलावले’, असा त्यांचा भाव होता. ही अनुभूती ऐकून उपस्थितांना साधना करण्याची प्रेरणा मिळाली. या वेळी तिथे प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होतेे. 
६ अ १ इ. कॅनडा 
६ अ १ इ १. टोरोंटो, ऑन्टारिओ : टोरोंटो येथील प्रथम एकदिवसीय आध्यात्मिक कार्यशाळा एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. क्रिस्टीन हार्डी यांनी घेतली. या कार्यशाळेला ४ नवीन जिज्ञासू आणि १ जण पूर्वीपासून सत्संगाला येणारे, असे एकूण ५ जण उपस्थित होते. या सगळ्यांनी कार्यशाळेत सक्रीय सहभाग घेऊन त्याचा लाभ करून घेतला. कार्यशाळेनंतर उपस्थितांपैकी एकाने नामजपाला आरंभ केला असून त्यांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘स्काईप’ सत्संगाला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
६ अ १ इ २. व्हॅन्कुअर, ब्रिटीश कोलंबिया : व्हॅन्कुअर येथे एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने एकदिवसीय आध्यात्मिक कार्यशाळेचे आयोजन सौ. राधा मल्लिक आणि श्री. समीर संघा यांनी केले. या कार्यशाळेला ४ नवीन जिज्ञासू उपस्थित होते. जिज्ञासूंनी कार्यशाळेच्या कालावधीत प्रायोगिक भागाविषयी अनेक शंका विचारून घेतल्या. एका जिज्ञासूने कार्यशाळेनंतर दत्ताचा जप चालू ठेवला असून तो संकेतस्थळाचे वाचन उत्सुकतेने करत आहे.
६ अ १ ई. युरोप 
६ अ १ ई १. क्रोएशिया : रेजेका आणि झाग्रेब येथे २ प्रवचने घेण्यात आली. 
६ अ १ ई २. रेजेका : येथील ७-८ जिज्ञासू नियमितपणे व्याख्यानांना उपस्थित रहातात आणि त्यांचा त्यात सक्रीय सहभाग असतो. त्या सर्वांनी प्रवचन लक्षपूर्वक ऐकले आणि त्याविषयी पुष्कळ शंका विचारून घेतल्या. एक महिला जिज्ञासू या व्याख्यानासाठी ७ वर्षांनी आल्या होत्या आणि त्यांना प्रवचनातील सर्व सूत्रांचे आकलन झाले. ७ वर्षांपूर्वी येथे घेतलेल्या व्याख्यान मालिकांना त्या उपस्थित होत्या; पण त्या वेळी त्यांना विषय समजणे कठीण होत होते. जर्मनीमधील हॅम्बर्ग येथे रहाणार्‍या एका सर्बियन महिला प्रवचनाला उपस्थित रहाता यावे, यासाठी जर्मनीला एक दिवस उशिरा गेल्या. या महिला गेली ३ वर्षे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळाच्या नियमित वाचक असून झाग्रेब येथील कार्यशाळेला उपस्थित रहाणार आहेत. 
६ अ १ ई ३. झाग्रेब : येथे उपस्थित असलेल्या सर्वांनी सकारात्मक अभिप्राय दिले आणि ते पुढील प्रवचनांना येण्यास इच्छुक आहेत. प्रवचनानंतर एका महिलेने अनुमाने २० मिनिटे पूर्वजन्माविषयीच्या शंका विचारून घेतल्या. 
६ अ १ ई ४. स्लोव्हेनिया : लुबियाना येथे घेण्यात आलेले प्रवचन छान झाले. उपस्थित महिलांनी प्रवचनातील सर्व सूत्रे लिहून घेतली. 
७. विभागात घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या 
    श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता ! 
- (पू.) श्री. मिलुटीन पांक्रात्स, युरोप (ऑक्टोबर २०१६) (समाप्त)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn