Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्र आणि कृतीप्रवणता !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने वाहनफेरी काढण्यात आली. जवळपास ७०० वाहने आणि १ सहस्र ५०० धर्मनिष्ठ सहभागी झालेले असल्याने फेरीला भव्यपणा आला होता. या देखण्या वाहनफेरीत हातात भगवे ध्वज घेतलेले आणि ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ या घोषणा देणारे युवक सामील असल्यामुळे ‘ही तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेकडे वाटचाल करणारी हिंदुत्वनिष्ठांची फेरी आहे’, असे विचार रहिवाशांच्या मनात डोकावून गेले. तरुण पिढीचे योगदान या कार्यासाठी मिळणे अत्यंत आवश्यक आहे, याचे कारण असे की, आजची ही तरुण पिढी भावी हिंदु राष्ट्राची जोपासना करणार आहे. वाहनफेरीच्या वेळी दिल्या जाणार्‍या घोषणा शौर्याच्या विचारांनी छाती फुगण्यास साहाय्य करत होत्या. छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी कार्यकालाची आठवण करून देणार्‍या त्या घोषणांना पादचारी लोक प्रतिसाद देत होते आणि ‘आम्हाला या फेरीचा अभिमान वाटतो’, असे सांगत होते. आलेली मरगळ झटकून टाकून जळगावचे रहिवासी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. लोकांच्या जीवनात चैतन्य ओतणारी ही फेरी होती. हिंदु राष्ट्र केवळ हाक देऊन स्थापन होणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेऊन परिश्रमच करायला हवेत, याची चुणूक दाखवणारी ही फेरी अविस्मरणीय झाली. फेरी जर अविस्मरणीय असेल, तर प्रत्यक्ष सभेचा रुबाब काय असेल ? हिंदु राष्ट्राची संकल्पना काळाच्या आवश्यकतेनुसार पुढे आलेली आहे. ती काळाची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र म्हणजे सात्त्विक लोकांनी सात्त्विक लोकांसाठी चालवलेले सात्त्विक लोकांचे राज्य ! विद्यमान पंतप्रधान देशातील भ्रष्टाचार निपटून काढून भारतियांना विकासाच्या दिशेने घेऊन जात आहेत. त्यांना त्यासाठी स्थूलातील योजनांचा आधार घ्यावा लागत आहे. तेथे मानसिक ताण-तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्थिती धर्मशिक्षण दिल्याने आपसूकच निवळेल आणि वातावरण सात्त्विक झाल्याने हिंदु राष्ट्राचा म्हणजे आनंदी राष्ट्राचा आरंभ होईल !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn