Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जागतिक प्रसारमाध्यमांकडून भारतातील नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीवर टीका !

  • पाश्‍चात्त्यांचा भारतद्वेष पुन्हा एकदा उघड !
  • भारत शासनाने कुठलाही राष्ट्रहिताशी निगडित कठोर निर्णय घेतल्यावर पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांच्या पोटात का दुखते ? ‘भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे’, असे सांगून थयथयाट करणार्‍या या प्रसारमाध्यांना भारताने भ्रष्टाचाराच्या विरोधात पावले उचलल्यावर हा निर्णय रूचत नाही, हे लक्षात घ्या ! भारत शासनाने महासत्ता होण्याच्या दृष्टीने प्रवास करतांना त्यात अडसर असणार्‍या पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांनाही वठणीवर आणण्यासाठी कृती करावी, ही अपेक्षा ! 
नवी देहली - न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, अल जझीरा अशा प्रसिद्ध जागतिक प्रसारमाध्यमांनी भारत शासनाने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्णय घेतल्यावर गोंधळ उडणे सहाजिकच आहे. हा गोंधळ व्हेनेझुएलाएवढा तीव्र नव्हता. असे असतांनाही या गोंधळाचा पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांकडून बाऊ का केला जात आहे ? - संपादक) नोटा पालटून घेण्यासाठी लोक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रांगा लावत आहेत, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. तर नोटाबंदीमुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिक यांचे कसे हाल होत आहेत, याचा आढावा बीबीसीने घेतला आहे. गरीब आणि मध्यमवर्ग यांना यामुळे फटका बसत आहे; तसेच काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळाविषयीही बीबीसीने वृत्त प्रसारित केले आहे. (हे वृत्त प्रसारित करतांना लोकांनी ‘आम्हाला त्रास होत असला, तरी आम्ही नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे समर्थन करतो’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया का नाही छापल्या ? एकांगी वृत्ते प्रसारित करणार्‍या पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांचा भारतद्वेष यातून दिसून येतो ! - संपादक)
१. ‘काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रीमंतांकडून का स्वागत करण्यात येत आहे ?’ असा प्रश्‍न द गार्डियनने विचारला आहे. (असे वृत्त छापून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा येथे हेतू दिसून येतो ! - संपादक) तर हाफिंग्टन पोस्टने नोटाबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचे वृत्त छापले आहे. (धर्मांधांकडून भारत, बांगलादेश आणि पाक येथे हिंदूंना ठार मारण्याच्या घटनांची हाफिंग्टन पोस्टने कधी नोंद घेतली आहे का ? - संपादक) 
२. अल जझीराने नोटाबंदी आणि एटीएम्मधील खडखडाट यांमुळे लोकांमध्ये असलेल्या संतापाचे वर्णन केले आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही नोटाबंदीमुळे भारतीय नागरिक कसे मेटाकुटीस आले आहेत, याचे वृत्त दिले आहे. 
३. द इंडिपेंडंटनेही नोटाबंदीमुळे बँकेत रक्कम जमा करण्यासाठी लोकांची कशी तारांबळ उडाली आहे, याचे वर्णन केले आहे. 
४. डेली मेलने नोटा पालटून घेण्यासाठी बँकेत आलेल्या हिंदू नरेंद्र मोदी यांच्या आईचा उल्लेख करून नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. (भारतात सर्व समान आहेत, याचे हे उदाहरण असतांना फिरवून वृत्त प्रसारित करणार्‍या डेली मेलचा भारतद्वेष यातून दिसून येतो ! - संपादक) फायनान्शियल टाइम्सने नोटाबंदीनंतर भारतात उद्भवलेली गोंधळसदृश परिस्थिती कायम असल्याचे म्हटले आहे; तर या नोटाबंदीचा फटका भारताच्या आर्थिक विकासाला बसणार आहे, असे इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सने म्हटले आहे. (भारताच्या आर्थिक विकासाची चिंता पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना कधीपासून वाटू लागली ? भारताच्या विकासाची चिंता करण्यास भारत शासन आणि भारतीय जनता समर्थ आहेत, हे त्यांनी जाणावे ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn