Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्यातील गुणमोती !

सद्गुरु
(कु.) अनुराधा वाडेकर
      ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर (सद्गुरु अनुताई) देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात ३ - ४ दिवस आल्या होत्या. तेव्हा त्या व्यस्त दिनक्रमातही स्वयंपाकघरात येत असत. त्या प्रसंगी त्यांच्यातील पुढील गुणमोतींचा लाभ करून घेता आला.
१. प्रीतीचे मूर्तीमंत रूप 
      सद्गुरु अनुताई साधकांशी बोलत असतांना जणू ‘फुलांचा वर्षाव होत आहे’, असे वाटते. त्यांच्या लयबद्ध बोलण्याने मन मंत्रमुग्ध व्हायला लागते. त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यांच्या दृष्टीतील सौंदर्य तर अवर्णनीय असते. त्या ‘आश्रमात येणार आहेत’, असे कळल्यावर उत्साह हृदयात मावत नाही. एकदा मी माझ्याकडून झालेली चूक त्यांना सांगितली. त्यांच्याशी बोलल्यावर माझी नकारात्मकता दूर होऊन उत्साह वाढला. सद्गुरु अनुताईंच्या साधकांविषयीच्या प्रेमाचे शब्दांत वर्णन करता येणार नाही.
२. साधकांना घडवणे 
अ. एकदा त्यांनी मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून दिली. 
आ. एकदा एकाच पटलावर सद्गुरु अनुताई आणि मी अल्पाहार करत होतो. तेव्हा एका साधिकेतील चांगल्या गुणांचे कौतुक करत त्या मला म्हणाल्या, ‘‘तिच्यातील हा गुण तूही शिकून घे.’’ त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे माझी आणि त्या साधिकेची जवळीक होऊन आम्हाला साधनेत साहाय्य झाले. 
३. साधनेसाठी प्रोत्साहन देणे 
अ. काही वेळा त्या स्वयंपाकघरात येऊन आम्हाला ‘स्वयंपाकघर आता अजून चांगले होणार आहे’, असे म्हणून प्रोत्साहन देत असत. तेव्हा मला लक्षात आले, ‘संतांचे बोलणे चैतन्यमयी असते आणि ते प.पू. गुरुदेवांच्या आठवणीत नेणारे असते.’ सद्गुरु अनुताई आश्रमात होत्या. तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन आईच्या वात्सल्याने शिकण्यासाठी आणि साधनेत प्रगती करण्यासाठी प्रेरणा दिली. त्या वेळी मला तेथे प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले. 
आ. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत माझे लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आले होते. त्या वेळी सद्गुरु अनुताईंनी माझे पुष्कळ कौतुक केले. तेव्हा वाटले, ‘आईच माझ्या पाठीवरून हात फिरवून सांगत आहे की, देव तुला पुष्कळ काही देत आहे. त्यातून शिकून घे. सतत कृतज्ञताभावात रहा !’
४. अनुभूती 
४ अ. सद्गुरु अनुताईंच्या सहवासात प्रत्यक्ष देव आल्याचे जाणवणे आणि प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : एकदा सद्गुरु अनुताई भेटल्यावर मला रडू आले. मी त्यांना सांगितले, ‘‘मला लवकरात लवकर प.पू. गुरुदेवांसारखे घडायचे आहे.’’ तेव्हा त्या प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवतांना म्हणाल्या, ‘‘तू सतत कृतज्ञताभावात रहा.’’ मी पुराणांमधील गोष्टींमध्ये ऐकले होते की, प्रत्यक्ष देव येतो. त्या वेळी मला तशी अनुभूती आली आणि प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले.
४ आ. सद्गुरु अनुताईंच्या सहवासातील क्षण आठवून भावजागृती होणे : एकदा मी ध्यानमंदिरात नामजप करायला बसल्यावर ३ - ४ दिवसांत सद्गुरु अनुताईंच्या सहवासात अनुभवलेले क्षण आठवत होते. तेव्हा माझी निराळीच भावावस्था निर्माण झाली. 
     हे दयाघना, हे भगवंता, तू रामनाथी आश्रमात आहेस; पण तू तर आमच्यासाठी देवद आश्रमातही आहेस. ‘माझे अस्तित्व नष्ट करून मला तुझ्या चरणांशी लवकरात लवकर घे’, अशीच तुझ्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
- आपलीच, 
कु. मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn