Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
   ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
६. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही
साधना करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक !
    ‘हिंदु राष्ट्र स्थापन झाले पाहिजे’, अशी इच्छा बाळगणारे अनेक हिंदुत्वनिष्ठ आहेत. यांपैकी किती हिंदुत्वनिष्ठांना ‘हिंदु राष्ट्र स्थापन होईल’, याविषयी निश्‍चिती आहे ? याउलट सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक अन् कार्यकर्ते यांना ‘हिंदु राष्ट्र स्थापन होईल’, याची निश्‍चिती आरंभीपासून वाटत आहे. याचे कारण म्हणजे त्यांची ईश्‍वर आणि गुरु यांच्यावरील श्रद्धा ! त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सातत्याने आणि टप्प्याटप्प्याने आत्मविश्‍वासासह प्रयत्न करत आहेत.
   विशेष म्हणजे हे करत असतांना ते कुठेही तणावग्रस्त नाहीत, तर दिवसेंदिवस त्यांच्यातील आनंद वाढत आहे. हे त्यांनी केलेल्या साधनेमुळे त्यांच्यात निर्माण झालेल्या ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांनाही साधना करण्यास प्रवृत्त करा. त्यासाठी संघटनेच्या स्तरावर तुम्ही पुढील प्रयत्न करू शकता. 
अ. संघटनेतील कार्यकर्त्यांना नामजपाची साधना करण्यास सांगा !
आ. संघटनेच्या बैठकांमध्ये ज्याप्रमाणे उपक्रमांचा आढावा घेतला जातो, त्याप्रमाणे थोडा वेळ राखून ठेवून ‘प्रत्येक कार्यकर्त्याने आठवड्याभरात साधना म्हणून कोणते प्रयत्न केले’, याचा आढावा घ्या !
इ. कार्यकर्त्यांना हिंदूसंघटनासाठी हानीकारक असलेल्या दोषांची जाणीव करून द्या आणि ते घालवण्यासाठी त्यांना साहाय्य करा !
    साधना करणार्‍या व्यक्तीचे जीवन हळूहळू नीतीमान आणि चारित्र्यसंपन्न बनत जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी साधना चालू केली की, त्यांच्यात व्यसनाधीनता, उद्धटपणा असे दोष, तसेच अहंकार असेल, तर ते हळूहळू न्यून होत जातील. साधनेमुळे त्यांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीही होईल. कार्यकर्त्यांनी साधना केल्यास ‘संघटनेचे कार्यही गुणात्मक स्तरावर अधिक चांगले होत आहे आणि कार्यकर्त्यांच्या वृत्तीमध्येही पालट होत आहे’, असे तुम्हाला अनुभवायला मिळेल.’ (२३.४.२०१२) (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn