Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काळानुसार योग्य नामजप योग्य प्रमाणात करा !

पू. संदीप आळशी
     सध्या प.पू. डॉक्टरांनी साधकांना ७० टक्के वेळ महर्षींनी सांगितलेला जप आणि ३० टक्के वेळ अन्य जप करण्यास सांगितले आहे. काही साधकांनी प.पू. डॉक्टरांची ही चौकट नीट वाचलेली नाही; त्यामुळे ते त्याप्रमाणे करत नाहीत. काही साधक या चौकटीत सांगितल्याप्रमाणे न करता स्वतःला कोणता जप आवडतो किंवा स्वतःचा कोणता जप चांगला होतो, यानुसार तो करतात. काही साधक महर्षींनी सांगितलेला जप आणि अन्य जप हे प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात करत नाहीत. योग्य नामजप योग्य प्रमाणात करण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.१. प.पू. डॉक्टरांनी सध्याच्या आपत्काळाच्या दृष्टीने साधकांचे हित लक्षात घेऊन जप करण्यास सांगितले आहे. आपण तशाच प्रकारे जप केला, तर त्यातच आपले कल्याण आहे; अन्यथा ती मनानुसार साधना होईल.
२. महर्षींनी सांगितलेला जप हा समष्टीसाठीचा जप असल्यामुळे तो केल्याने साधकांची समष्टी साधना आपोआपच होणार आहे.
३. साधकांनी महर्षींनी सांगितलेला जप केल्याने समष्टी आक्रमणांचा परिणाम काही प्रमाणात तरी अल्प होईल. तसे न झाल्यास समष्टी आक्रमणांचा आघात एकट्या गुरूंना झेलावा लागेल. गुरु तो आघात झेलायला समर्थ असले, तरी आपल्यामुळे गुरूंना त्रास होऊ नये, याची काळजी घेणे, हा साधकांचा धर्म अन् कर्तव्यच आहे !
- (पू.) श्री. संदीप आळशी (२०.१२.२०१६)

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn