Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सर्वश्रेष्ठ हिंदु धर्माची आज दुःस्थिती झाली आहे ! - कैलासगिरीजी महाराज, गिरीमठ

सावखेडा येथील हिंदु धर्मजागृती 
सभेत ४०० हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती ! 

डावीकडून पराग गोखले, दीपप्रज्वलन करतांना
कैलासगिरी महाराज, कैलास कुर्‍हाडे, प्रतीक्षा कोरगावकर

       सावखेडा (संभाजीनगर) - मुसलमान मुलीचे नखही आपल्याला दिसत नाही; मात्र हिंदु मुलीचे कपडेही योग्य नसतात. आपल्या प्राचीन, सर्वश्रेष्ठ आणि महान अशा हिंदु धर्माची आज ही दुःस्थिती झाली आहे, असे प्रतिपादन गिरीमठ येतील कैलासगिरीजी महाराज यांनी केले. ते संभाजीनगर मधील गंगापूर तालुक्यातील सावखेडा गावातील हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. ४ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेला ४०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. महाराजांनी आशीर्वादपर भाषणात हिंदु धर्माचे महत्त्व विषद केले.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य
कौतुकास्पद ! - कैलासगिरीजी महाराज, गिरीमठ
       हिंदु जनजागृती समितीचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत गिरीमठाचे महंत कैलासगिरीजी महाराजांनी हिंदु जनजागृती समितीचे कौतुक केले.
संताच्या संकल्पाने २०२३ मध्ये हिंदु 
राष्ट्र स्थापन होणार म्हणजे होणारच ! 
- श्री. कैलास कुर्‍हाडे, धर्मयोद्धा संघटना
       संताच्या संकल्पाने २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होणार म्हणजे होणारच, असा विश्‍वास गोवा येथे झालेल्याा पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनानंतर निर्माण झाला आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पवित्र कार्यात 
सर्वांनी सहभागी व्हा ! - पराग 
गोखले, हिंदु जनजागृती समिती
       हिंदुघातकी निधर्मी राष्ट्र्रामुळे हिंदूंना अनन्वित त्रास भोगावे लागले. हिंदु नेत्यांच्या होणार्‍या हत्या, काश्मिरी हिंदूंची दु:स्थिती, गोहत्याबंदी असूनही गायींची होणारी कत्तल हे सर्व हिंदुघातकी निधर्मी राष्ट्रामुळेच होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पवित्र कार्यात सहभागी व्हायला पाहिजे.
आत्मसंरक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने रणरागिणी
व्हावे ! - कु. प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा
       आज देशभरात असुरक्षिततेचे वातावरण पहाता प्रत्येक स्त्रीने आता आत्मबलसंपन्न व्हायलाच पाहिजे. स्वसंरक्षण ही काळाची आवश्यकता असल्याने सर्वांनी स्वत:च्या रक्षणासाठी प्रशिक्षित व्हायलाच पाहिजे.
विशेष !
१. शेंदुरवादा, सावखेडा या गावांतील मुलांनी सभेच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतला. शेंदुरवादा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्गातील ७ जण सभेच्या सेवेत सक्रीय होते.
२. शेंदुरवादा येथील १२ जणांनी शेजारच्या ८ गावांत जाऊन प्रसार केला. शेंदुरवादा येथील ७ व्या इयत्तेेत शिकणारा कु. गणेश शेळके याने ८ गावांत जाऊन सभेचा प्रसार केला होता.
३. सावखेडापासून ४ कि.मी.वर असलेल्या ओझर गावातून काही हिंदुत्वनिष्ठ आले होते. धर्मासभा झाल्यावर गावात जाऊन सभेतील सर्व सूत्रे त्यांनी अन्य हिंदुत्वनिष्ठांना सांगितली.
४. सभेनंतर २ ठिकाणी अशाच हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात याव्यात, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी केली.
५. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत ८ गावातील हिंदुत्वनिष्ठ धर्मशिक्षणवर्गासाठी एकत्रित येणार आहेत, असे ठरले.
६. ३० डिसेंबर या दिवशी ३१ डिसेंबरनिमित्त प्रबोधनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn