Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे.  त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१४.१२.२०१६ - तिरुवण्णामलई, तमिळनाडू
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. महर्षींनी संरक्षक उपाय सांगणे
१ अ. कलशांवरील नारळ सनातनच्या रामनाथी आश्रमात विविध ठिकाणी प्रवेशद्वारावर बांधायला सांगणे : काल पूजन केलेल्या ८ कलशांवरील नारळ महर्षींनी सनातनच्या रामनाथी आश्रमात लवकरात लवकर पाठवायला सांगितले. महर्षि म्हणाले, नारळ पिवळ्या कापडात बांधून तो रामनाथी आश्रमाचे मुख्य प्रवेशद्वार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या खोलीचे प्रवेशद्वार यांवर मध्यभागी बांधावा. आणखी उरलेले ४ नारळ रामनाथी आश्रमात त्रास असणार्‍या ठिकाणी प्रवेशद्वारावर बांधावेत. बांधलेला नारळ वजनाने हलका झाल्यावर तो कापडासहित पाण्यात विसर्जित करावा.
     (महर्षींनी असे सांगितले असले, तरी नंतर सायंकाळी कळले की, ते नारळ आम्ही विधीच्या ठिकाणाहून घ्यायला विसरलो आहोत. पू. डॉ. ॐ उलगनाथन् दुपारी चेन्नईला परततांना त्या ठिकाणी कुलूप लावून गेले होते. त्यामुळे ते नारळ तेथेच राहिले. ही गोष्ट त्यांना सांगून आम्ही महर्षींची क्षमा मागितली. तेव्हा महर्षि उदार मनाने आम्हाला क्षमा करून म्हणाले, ते नारळ इतर ठिकाणी तुम्ही विसरला असता, तर ती तुमची मोठी चूक झाली असती; पण ते नारळ विधीच्या ठिकाणी राहिले असल्याने फारसे बिघडत नाही. आम्ही तेथूनच त्यांची शक्ती रामनाथी आश्रमात आवश्यक ठिकाणी पोचवू. - सौ. गाडगीळ)
१ आ. कलशांतील पाणी आश्रमात शिंपडायला सांगणे : काल पूजन केलेल्या ८ कलशांतील पाणी एकत्र करून महर्षींनी ते सनातनच्या रामनाथी आश्रमात पाठवण्यास सांगितले. या पाण्यात गुलाबपाणी घालून ते पाणी आश्रमात सगळीकडे शिंपडायचे आहे. यामुळे आश्रमाची शुद्धी होऊन तेथील देवतांच्या तत्त्वामध्ये वृद्धी होईल, असे महर्षि म्हणाले.
२. आशीर्वादाचे नाडीपट्टीवाचन
    कार्तिक दीपम् सोहळा झाल्याप्रित्यर्थ आज येथे यज्ञ झालेल्या ठिकाणी आशीर्वादाचे नाडीपट्टीवाचन होते. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी त्यासाठी आम्हाला दुपारी बोलावले होते. ते नाडीवाचन आमच्यासमोर झाले.
३. उद्या आम्ही दुपारी १२ वाजता चेन्नईला प्रयाण करणार आहोत. तेव्हा प्रथम गिरिवलयम् (पर्वताला प्रदक्षिणा घालून) मग पुढे जाणार आहोत.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१४.१२.२०१६, दुपारी ४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn