Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मराठवाड्यातील बनावट मदरशांद्वारे अनुदान लाटणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! - आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना

डॉ. राहुल पाटील
अवैध कृत्यांच्या विरोधात आवाज उठवणारे
आमदार डॉ. राहुल पाटील यांचे अभिनंदन !
     नागपूर - मुसलमान मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मदरशांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांसाठी राज्यशासनाने झाकीर हुसैन मदरसा अनुदान ही योजना चालू केली. ही योजना चालू करताच मुसलमान समाजातील अनेकांनी कागदावरच मदरसा दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संभाजीनगरचे जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी जिल्ह्यातील २२५ मदरशांची झडती घेतली. या वेळी बहुतांश ठिकाणी मदरसे अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले. अनेक मदरशांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव होता, तर विद्यार्थ्यांची संख्या कागदोपत्री दाखवून अनुदान उचलत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अशा आशयाची वृत्ते अनेक वृत्तपत्रांतून ठळकपणे प्रसिद्ध झाली. त्यामुळे मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली शहरांसह ग्रामीण भागातील बनावट मदरशांची चौकशी करून शासनाचे लक्षावधी रुपयांचे अनुदान लाटणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे परभणी येथील आमदार डॉ. राहुल पाटील यांनी १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली.
     डॉ. राहुल पाटील म्हणाले की, ३ वर्षांपासून मदरशांना अनुदान दिले जात असून प्रत्येकी २ ते ४ लक्ष ५० सहस्र रुपयांपर्यंत अनुदानाचे वाटप करण्यात येते. (३ वर्षे अशा प्रकारे अनुदान लाटले जात असतांना सरकार आणि प्रशासन यांच्या लक्षात कसे आले नाही कि त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे ! - संपादक) विशेष म्हणजे ४ लक्ष ५० सहस्र रुपयांच्या अनुदानामध्ये ५० सहस्र रुपये ग्रंथालयासाठी, २ लक्ष रुपये फर्निचरसाठी आणि संगणक खरेदीकरिता, तर उर्वरित २ लक्ष रुपये शिक्षकांना अनुदान म्हणून देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या संख्येवर आणि वर्गावर या अनुदानाचे वाटप होते. शहरातील संवेदनशील भागातील मदरशांची पडताळणी करण्यासाठी पथक गेले असता त्या ठिकाणी संस्थाचालक उपस्थित होते; मात्र संस्थाचालकांना मदरसे, विद्यार्थी आणि शिक्षकही दाखवता आले नाहीत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn