Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नाशिक जिल्ह्यातील गडकोट संवर्धनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘किल्ले वाचवा !’ आंदोलन शिवकार्य गडकोट मोहिमेचा उपक्रम

गडकोट संवर्धनासाठी निवेदन द्यावे लागणे, हे लज्जास्पद नव्हे का ? 
गडकोटांच्या संवर्धनासाठी ‘हिंदु राष्ट्र’ (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
     नाशिक, १७ डिसेंबर - राज्यासह जिल्ह्यामध्ये अनेक पुरातन किल्ले असून ते पडक्या स्थितीत आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे त्या गडकोट किल्ल्यांची अतोनात हानी होत आहे. या गडकोटांचे संवर्धन करण्यासाठी तातडीने यंत्रणा नेमून त्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात यावा. तसेच हा ऐतिहासिक ठेवा पुरातत्व पद्धतीने जतन करण्यात यावा, या आणि अन्य मागण्यांसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवकार्य गडकोट मोहिमेच्या वतीने १६ डिसेंबरला आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनानंतर देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडकोटांवर व्यसनी लोकांचा वावर वाढला असून अनुचित प्रकार वाढले आहेत. यामुळे इतिहासाचे विद्रुपीकरण होत आहे. सरकारने राज्यातील १० दुर्गांसाठी निधीची तरतूद करूनही कोणतेही कामकाज झालेले नाही. त्यामुळे दुर्ग संवर्धनाचे काम वेगाने हाती घ्यावे. 
क्षणचित्र - आंदोलनाच्या वेळी ‘जेव्हा गड बोलू लागला’ हे एकपात्री नाटक सादर करून त्यात किल्ल्यांची व्यथा मांडण्यात आली. त्यानंतर दुर्गगीत सादर करण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn