Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जागतिक शक्तीशाली व्यक्ती !

संपादकीय
      अमेरिकेतील ‘फोर्ब्स’ मासिकाने जगातील पहिल्या १० शक्तीशाली व्यक्तींची सूची सिद्ध केली आहे. एरव्ही अमेरिकी आस्थापनांना जागतिक घडामोडीत लक्ष घालण्याचा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, समाज, रस्ते, सुविधा, वगैरे संबंधांत अहवाल सिद्ध करून तो प्रसिद्ध करण्याचा एक छंद जडलेला असतो, ही गोष्ट मान्यच करावी लागेल. फोर्ब्स या आस्थापनाचे शक्तीशाली व्यक्तींची सूची सिद्ध करण्याचे काम, हा त्यापैकीच एक कार्यक्रम आहे. चालू वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या सूचीत भारतीय पंतप्रधान मोदी ९ व्या क्रमांकावर आहेत, तर रशियाचे अध्यक्ष प्रथम क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रॅम्प दुसर्‍या क्रमांकावर, तर तिसर्‍या क्रमांकावर जर्मनीच्या अध्यक्षा असून चौथ्या क्रमांकावर चीन आहे. काही वर्षांपूर्वी अशीच सूची सिद्ध करण्यात आली होती आणि त्यात सोनिया गांधी यांच्या नावाचा समावेश होता. जगातील शक्तीशाली व्यक्तींच्या सूचीत सोनिया गांधी यांचे नाव असल्याचे भारतीय जनतेला कळल्यावर ती अचंबित झाली. अर्थात् खंडप्राय भारत देशाचा राज्यकारभार चालवण्याचे दायित्व ज्या पंतप्रधानांकडे आहे, त्या पंतप्रधानांवर सोनिया गांधी यांचा ‘रिमोट कंट्रोल’ चालत होता, ही गोष्ट काँग्रेसी राजवटीत उघड झाली होती. हे एवढे कारण सोनिया गांधी यांना शक्तीशाली व्यक्ती म्हणून घोषित करण्याला पुरेशी होती. राजकीय वातावरण नेहमीच अस्थिर आणि अनिश्‍चित असते. त्या वेळची शक्तीशाली व्यक्ती सोनिया गांधी आज पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपडत आहे, म्हणजेच राजकीय क्षेत्रातील स्वतःचे स्थान गमावून बसली आहे. त्या अंधारात चाचपडत आहेत, तर पंतप्रधान मोदी शक्तीशाली व्यक्तींच्या सूचीत स्थान मिळवून बसले आहेत. पंतप्रधान मोदी यांची शक्तीशाली व्यक्ती म्हणून निवड व्हायला कोणती गोष्ट निमित्त आहे ? त्यांनी त्यांच्या उद्यमशीलतेतून भारतीय जनतेला भारावून टाकले आहे. केंद्रशासन जनताभिमुख आहे, अशी भारतियांची भावना आहे. पंतप्रधानांना पर्याय ठरेल, अशी एकही व्यक्ती आज राजकीय क्षेत्रात नाही, असे जनतेला वाटते. स्वच्छ चारित्र्य आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग ही त्यांची दोन वैशिष्टे जनतेला फारच भावली आहेत. ५०० आणि १ सहस्र मूल्याच्या चलनी नोटा चलनातून मागे घेण्याचा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी एका घावात अनेक गोष्टी साध्य केल्या, ज्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी पूरक आहेत. जनता त्यामुळे पंतप्रधानांच्या पाठीशी उभी आहे. पंतप्रधानांनी आरंभीच्या काळात ‘चांगले दिवस येतील’, असे म्हणून जनतेला आश्‍वस्त केले होते. त्या आश्‍वासनाची पूर्ती त्यांनी केली की, शक्तीशाली व्यक्तींच्या जागतिक सूचीत त्यांच्या क्रमांकाला बढती मिळेल, हे निश्‍चित !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn