Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तेलंगण सरकार रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुलांना मुख्य प्रवाहात आणणार !

म्यानमारमधील मुसलमानांविषयी पुळका आलेल्या तेलंगण सरकारने
कधी विस्थापित काश्मिरी हिंदु मुलांचा विचार केला आहे का ?
    भाग्यनगर - तेलंगणातील रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुलांना इतरांशी बोलता यावे यासाठी त्यांच्यापैकी बर्‍याच मुलांना अवगत असलेल्या हिंदी आणि उर्दू भाषांचा उपयोग करून सर्वत्र प्रचलीत असलेली इंग्रजी भाषा त्यांना शिकवण्यात येणार आहे. असे करून त्यांना लवकरच मुख्य प्रवाहातील सरकारी शाळांमध्ये सामावून घेण्यात येईल. त्यासाठी तेलंगणाचे शिक्षण खाते आणि एन्सीईआर्टी यांनी संयुक्तपणे आखलेला अभ्यासक्रम हल्लीच घोषित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम १० मासांमध्ये पूर्ण करण्याच्या हेतूने ३ स्तरावर बनवला गेला आहे, असे समजतेे. (विदेशातून शरणार्थी म्हणून आलेल्या रोहिंग्या मुसलमान मुलांची काळजी घेण्याऐवजी भारतातील हिंदु मुलांची काळजी घेतल्यास देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास साहाय्य होईल, हे राज्य सरकारला कळत नाही का ? हिंदूंनी कररूपाने दिलेल्या पैशांचा वापर धर्मांधांची मतपेढी सिद्ध करण्यासाठी वापरून देशाचे अकल्याण करणार्‍या राज्यकर्त्यांना जनतेनेच घरी बसवावे ! - संपादक) या प्रकल्पांतर्गत सेव्ह द चिल्ड्रन आणि संयुक्त राष्ट्राच्या उच्च आयुक्तांच्या विद्यमाने निर्वासितांसाठी चालू करण्यात आलेल्या शाळेत ही मुले हा अभ्यासक्रम शिकतील. सेव्ह द चिल्ड्रनच्या प्रशांती बथीना म्हणाल्या की, रोहिंग्या मुसलमानांच्या मुलींनाही घराबाहेर यायला साहाय्य होईल. या मुलींचे पालक विशेषकरून पाल्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा यांविषयी जागरूक आहेत. यासाठी त्यांच्या परिसरातील अशी शाळा हा प्रश्‍न सोडवू शकते. सर्वांना उपयुक्त आणि संघर्षाविना त्या मुुलांच्या गरजा पूर्ण करू शकेल, असा हा अभ्यासक्रम आहे.
     सध्या १५० मुले या शाळेत जातात आणि त्यांपैकी १२० मुले जून २०१७ पर्यंत शाळांच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतली जातील, असा विश्‍वास प्रशांती यांना वाटतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn