Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आमदारांना २ लक्ष वेतनावर प्राप्तीकर आकारण्यात येणार !

मुख्य सचिवांप्रमाणे भत्ते मिळणार नाहीत !
     नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - महाराष्ट्रातील आमदारांना मुख्य सचिवांइतके वेतन आणि इतर भत्ते देण्याविषयी गेल्या अधिवेशनातील निर्णयावर टीका झाल्यानंतर आता त्यांना इतर भत्ते दिले जाणार नाहीत. तसेच त्यांच्या वेतनावर प्राप्तीकर आकारण्यात येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या १५ डिसेंबर या दिवशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (राज्यावर साडेतीन लक्ष कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा असतांना आमदारांना २ लक्ष रुपये इतके वेतन आवश्यक आहे का ? याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. - संपादक)       राज्याच्या मुख्य सचिवांइतके मूळ ८० सहस्र रुपये वेतन आणि महागाई भत्ता मिळून आमदारांसाठी २ लक्ष रुपये मासिक वेतन निश्‍चित करण्यात आले होते. या तरतुदींसह त्यांना मुख्य सचिवांप्रमाणे इतर भत्ते देण्याची तरतूद असलेले विधेयक विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात संमत करण्यात आले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn