Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सौ. नेहा जोशी यांना प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. ‘प.पू. डॉक्टर आणि श्रीकृष्ण एकच आहेत’, अशी अनुभूती येणे आणि आनंदात पुष्कळ वाढ होऊन त्यांच्याप्रती भाव वाढणे : ‘प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या काही दिवस आधीपासून मला ‘ते आणि श्रीकृष्ण एकच आहेत’, अशी अनुभूती येत होती. अमृत महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी जीवनाडी वाचनाच्या कार्यक्रमात महर्षींनी ‘प.पू. डॉक्टर आणि श्रीविष्णु हे एकच आहेत’, असे सांगितले. वरील अनुभूती बर्‍याचदा येऊ लागल्याने माझ्या आनंदात पुष्कळ वाढ होऊन त्यांच्याप्रती माझा भाव वाढला.
२. श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे पहातांना ‘मी त्याच्याकडेच ओढली जात आहे आणि मला त्याचेच वेड लागले आहे’, असे वाटून त्याच्या रूपाकडे मी एकटक बघत असे.
३. स्वयंपाक करतांना माझ्या मनात श्रीकृष्णाविषयीचे विचार आपोआपच चालू झाले. ते विचार थांबतच नव्हते आणि त्यातून पुष्कळ आनंद मिळत होता.’
- सौ. नेहा नागेश जोशी, पुणे गुरुसेवेची तळमळ असली की, देव साहाय्य करतो आणि सेवा पूर्ण करवून घेतो, याची साधकाने घेतलेली अनुभूती : ‘प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी अर्पण गोळा करण्याची सेवा करतो. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या काळात मला सतत चक्कर येणे, तोल जाणे अशा स्वरूपाचे शारीरिक त्रास होत होते. त्यामुळे या वेळी मला प्रत्यक्ष अर्पण गोळा करायला जाता आले नाही. तेव्हा मला वाटले की, आपण शरिराने अर्पण गोळा करू शकत नाही, तर वर्गणीदारांना दूरभाष करून अर्पण मागूया. त्याप्रमाणे मी वर्गणीदाराना दूरभाष करून अर्पण मागायला आरंभ केला. ईश्‍वराचीच कृपा की, ज्यांना ज्यांना दूरभाष करून अर्पण मागितले, त्या सर्वांनी अर्पण घरी आणून दिले. त्या वेळी मला ईश्‍वराविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ श्री. पांडुरंग जोशी, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn