Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

स्वाईप मशीन नसल्याने ग्राहकांना देयक देण्यातील अडचणी वाढल्या !

     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - हिवाळी अधिवेशनाकरता राज्यभरातून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी नागपूर विधीमंडळ परिसरात आहेत. विधानभवन परिसरातील विविध उपाहारगृहांमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डने देयक देण्याकरिता स्वाईप मशीनची व्यवस्थाच नसल्याने त्यांचा मनस्ताप वाढला आहे. सुटे पैसेे घेण्याकरिता अनेकांना अनेक ठिकाणी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. 
     नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा रोखण्यासाठी कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे राज्यभरातून विधानभवन परिसरात आलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नोटबंदीला एक मास झाला असतांना चलनाचा तुटवडा मात्र कायम आहे. काळा पैसा रोखण्याकरिता मोदी शासनाच्या निर्णयाचे स्वागत होत असले तरी सर्वसामान्यांना मात्र याचा प्रचंड त्रास होत आहे. शासनाने नियोजन केले नसल्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी नागरिकांना डेबिट क्रेडिट कार्डने वा ऑनलाईन पैसे देण्याचेे आवाहन केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn