Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भगवद्गीता आणि महाभारत यांचे धडे आपल्या शिक्षणक्रमात हवेच ! - निवृत्त न्यायमूर्ती दवे

१. श्रीमद्भगवद्गीता आणि महाभारत हे मुलांना बालवयापासून शालेय जीवनात शिकवले पाहिजे ! 
     ‘२.८.२०१४ या दिवशी कर्णावती (अहमदाबाद) येथे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती ए.आर्. दवे म्हणाले, ‘श्रीमद्भगवद्गीता आणि महाभारत हे मुलांना बालवयापासून शालेय जीवनात शिकवले पाहिजे.’ खरे म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावर भारतात गदारोळ उठण्याचे काहीच कारण नव्हते; कारण महाभारत हे भारताचे आणि श्रीमद्भगवद्गीतासुद्धा भारताचीच ! तिचे धडे भारतात द्यायचे नाहीत, तर मग काय ते केनियात द्यायचे ? युक्रेनमध्ये द्यायचे कि ब्राझिलमध्ये द्यायचे ? 
२. नेहरूनिर्मित विकृत परंपरा देशाच्या भूमीतून कायमची 
हद्दपार होईल, तो दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला पाहिजे ! 
     हिंदु समाजाच्या भावविश्‍वातील कुठलाही विषय आला की, त्याच्यावर तुटून पडायचे, ही आपली भारतातील निधर्मी परंपरा झाली आहे. ही विकृत, निधर्मी परंपरा नेहरूंनी या देशात निर्माण केली. ज्या दिवशी ही नेहरूनिर्मित विकृत परंपरा या देशाच्या भूमीतून कायमची हद्दपार होईल, तो दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला पाहिजे. आपण सर्वांनी जसे ठरवून सत्तांतर केले, तसेच हे पवित्र कार्य आपल्याला सर्वांना मिळूनच करायचे आहे.
३. गुरु-शिष्य ही आपली प्राचीन परंपरा अस्तित्वात असती, 
तर या देशात हिंसाचार आणि आतंकवाद दिसला नसता !
      या वेळी न्यायमूर्ती ए.आर्. दवे म्हणाले, ‘भारताने आपल्या प्राचीन परंपरेकडे गेले पाहिजे. महाभारत आणि श्रीमद्भगवद्गीता यांचा परिचय बालवयातच आपल्या मुलांना करून दिला पाहिजे. गुरु-शिष्य परंपरा ही आपली प्राचीन परंपरा आहे. ती परंपरा आज अस्तित्वात असती, तर या देशात हिंसाचार आणि आतंकवाद निर्माण झाला नसता !
४. जे चांगले आहे, ते कुठेही का असेना; पण ते आपण मिळवले पाहिजे !
     मी भारताचा हुकूमशहा असतो, तर मी मुलांना पहिल्या इयत्तेपासूनच गीता आणि महाभारत शिकवणे अत्यावश्यक केले असते. मी असे म्हटल्यामुळे ‘मी निधर्मी नाही’, असे जर कुणी म्हटले, तरीही मी त्याची तमा (फिकीर) बाळगत नाही. जे चांगले आहे, ते कुठेही का असेना; पण ते आपण मिळवले पाहिजे.’ न्यायमूर्ती दवे यांनी हे साहस दाखवले, त्याविषयी त्यांचे अभिनंदन ! 
५. माणसाला नैतिकतेचे, कर्मप्रेरणेचे आणि वैश्‍विक होण्याचे शिक्षण 
देणारी ‘श्रीमद्भगवद्गीता’ आपल्या शिक्षणक्रमाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे !
      आज नेहरूंच्या विकृत निधर्मीपणामुळे आपल्या शाळांतून गीतेचे पठण करता येत नाही; पण इथे बायबलचे आणि कुराणाचे पठण करायला काही अडचण नसते, म्हणजे ही विकृतीचीही विकृती झाली. या सर्व विरोधाला पायाखाली दाबून आपण आपल्या सत्त्वाचे रक्षण केले पाहिजे आणि ते शासनालाही करायला भाग पाडले पाहिजे. कुणाच्याही विरोधाची कसलीही तमा न बाळगता माणसाला नैतिकतेचे, कर्मप्रेरणेचे आणि वैश्‍विक होण्याचे शिक्षण देणारी श्रीमद्भगवद्गीता आपल्या शिक्षणक्रमाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे !’
- श्री. रमेश पतंगे, (संदर्भ : साप्ताहिक ‘विवेक’, २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn