Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सदगुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईश्‍वरी ज्ञानातून स्वतःच्या साधनेविषयी मिळालेली माहिती

श्री. दिवाकर आगावणे
१. सदगुरु (सौ.) गाडगीळकाकू विश्रांती 
घेत असतांना ध्यानावस्थेत असल्याप्रमाणे बोलणे
     ‘सदगुरु (सौ.) गाडगीळकाकूंना ईश्‍वरी ज्ञान मिळते, हे सर्वांना ज्ञातच आहे. ९.१२.२०१६ या दिवशी रात्री १२.३५ वाजता सदगुरु काकू विश्रांती घेत होत्या. त्यांना विश्रांतीला जाऊन अर्धा घंटा झाला होता. अकस्मात् त्या माझ्याशी हळूहळू आणि थांबत थांबत बोलू लागल्या. मला असे वाटले, ‘त्या ध्यानावस्थेतच बोलत आहेत आणि जणू त्या प्रत्यक्ष ती स्थिती अनुभवत आहेत.’ 
२. सदगुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी विश्रांती घेत 
असतांना त्यांना स्वतःच्या साधनेविषयी जाणवलेली सूत्रे 
२ अ. सदगुरु गाडगीळकाकू यांना त्या कैलास पर्वतावर उभ्या राहून तपस्या करत असल्याचे आणि शिवाकडून त्यांना प्रकाशाच्या रूपात आशीर्वाद मिळत असल्याचे जाणवणे : त्या म्हणाल्या, ‘‘मी डोळे बंद करते, तेव्हा पुष्कळ वेळा ‘मी कैलास पर्वतावर उभी राहून तपस्या करत आहे’, असे मला जाणवते. कैलासावर शिव बसलेला आहे. तेथून तो मला आशीर्वाद देत आहे. शिवाकडून मला प्रकाशाच्या रूपात आशीर्वाद मिळत आहे’, असे मला जाणवते.’’२ आ. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना त्या सहस्रो वर्षांपासून तपस्या करत असल्याचे जाणवणे : त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मी एका पायावर म्हणजेच डाव्या पायावर उभी राहून (ताडासनासारखे) दोन्ही हात वरच्या दिशेने नमस्काराच्या मुद्रेत ठेवून उभी आहे. मी सहस्रो वर्षांपासून तपस्या करत आहे’, असे मला जाणवते.’’ 
२ इ. सदगुरु गाडगीळकाकूंचे एक रूप अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी बाहेर पडले असल्याचे जाणवणे : त्या म्हणाल्या, ‘‘मी अंगावर पांढर्‍या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे आणि त्याला लाल रंगाची किनार आहे. मी तपस्या करत असलेल्या या रूपातूनच एक रूप घेऊन या कार्यासाठी बाहेर पडले आहे आणि प.पू. डॉक्टरांच्या चरणांशीच हे कार्य चालू आहे’, असे मला जाणवते.’’ 
     काकू सांगत असतांना मीसुद्धा हे दृश्य प्रत्यक्ष अनुभवत होतो. केवळ त्यांच्या सहवासामुळेच मी हे दृश्य प्रत्यक्षात अनुभवू शकलो. कुंभकोणम् येथे झालेल्या एका वाचनात महषींनी सद्गुरु काकूंविषयी ‘तू शिवपुत्री आहेस’, असे सांगितले. (हे सप्तर्षि जीवनाडीमधील नाही. २ वर्षांपूर्वी दुसर्‍या एका नाडीवाचनात सांगितल्याप्रमाणे आहे.) सद्गुरु काकूंनी अशा प्रकारे संभाषणातून ज्ञान सांगण्याचा आणि ते ऐकण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. प्रत्यक्ष गुरूंच्या कृपेने त्यांचा सत्संग आम्हा सर्वांना लाभला आहे. हे भाग्य शब्दांत कसे वर्णावे ? देवा, या अमूल्य संधीचा गुरूंना अपेक्षित असा लाभ आम्हाला करून घेता येऊ दे, अशी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
- श्री. दिवाकर आगावणे, ईरोड, तमिळनाडू, (१०.१२.२०१६, संध्याकाळी ५.०६ वाजता)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn