Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न यांवरून सरकारची कोंडी करणार ! - धनंजय मुंडे

स्वतःच्या सत्ताकाळात कोणत्याही समस्या सोडवू न शकलेल्या विरोधकांची पोपटपंची !
      नागपूर, ४ डिसेंबर (वार्ता.) - नोटाबंदी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि ढासळती कायदा आणि सुव्यवस्था यांवरून सरकारची ५ डिसेंबरपासून चालू होणार्‍या हिवाळी अधिवेशनात कोंडी करणार आहोत. राज्यातील हे महत्त्वाचे प्रश्‍न सरकार सोडवू न शकल्याने सत्ताधारी पक्षाने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांसह अनेक आमदार उपस्थित होते.
      ते पुढे म्हणाले की, नोटाबंदीच्या माध्यमातून ४ लक्ष कोटी काळे धन बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने ४० लक्ष कोटी रुपये व्यय केले आहेत. तसेच नोटाबंदीमुळे शेतकरी आणि छोटे व्यापारी यांची २० सहस्र कोटी रुपयांची हानी झाली. अशांना राज्य सरकारने केंद्र सरकारकडून अनुदान मिळवून द्यावे. देशातील गुन्हेगारांची राजधानी म्हणून नागपूरची ओळख होत असून राज्याची कायदा-सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट झाली आहे. तसेच शासन मराठा, मुसलमान आणि धनगर या समाजांना आरक्षण देण्यासंबंधी फसवणूक करत आहे. (धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर असतांना त्यांनी लोकांना आरक्षणाचे गाजर दाखवले ! तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते. सत्ताधार्‍यांवर टीका करण्याऐवजी विरोधकांनी स्वतः आत्मचिंतन करावे ! - संपादक)
सरकार जनतेशी संवेदनाशून्य कोल्ड प्ले खेळत आहे ! - राधाकृष्ण विखे-पाटील
     सरकारला सत्तेत येऊन २ वर्षे पूर्ण झाली, तरी त्याच्यामध्ये परिपक्वता दिसून येत नाही. सध्याचे सरकार हे डोरेमॉन या कार्टूनप्रमाणे काम करत असून जनतेला वास्तवतेपासून दूर नेत आहे. सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा चांगला असला, तरी सर्वसामान्यांना तो त्रासदायक आणि तोट्याचा ठरला आहे. नोटा पालटून घेण्याच्या रांगेत अनेकांचा मृत्यू झाला असून एकाही काळा पैसेवाल्याचा त्यात मृत्यू झालेला नाही. तसेच अनेक रुग्णांनाही नोटा उपलब्ध नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा प्रविष्ट व्हायला हवा. जिल्हा अधिकोषांमध्ये नोटा पालटण्याच्या निर्णयावर बंदी घालून सरकारने शेतकर्‍यांचीच कोंडी केली आहे. त्या माध्यमातून सरकार सहकार क्षेत्र मोडीत काढत आहे. सध्याचे सरकार हे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत असून संवेदनाशून्य आहे. एकूणच सरकारचा कारभार पहाता ते जनतेशी संवेदनाशून्य कोल्ड प्ले खेळत आहेत.
     क्षणचित्र - या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर टीका करतांना काही हिंदी चित्रपटातील गाणी आणि हिंदी चित्रपट यांचा संदर्भ दिला. त्या वेळी पत्रकारांमध्ये चर्चा चालू होती की, विरोधी पक्षाच्या सदस्यांना काही काम नसल्याने त्यांना हिंदी चित्रपट आणि गाणी ऐकण्यास वेळ मिळाला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn