Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

२०० राजकीय पक्षांना पक्षांच्या सूचीतून वगळले !

   नवी देहली - निवडणूक आयोगाने २०० राजकीय पक्षांची नावे सूचीतून वगळली आहेत. आयोगाला पक्षांची नोंदणी रहित करण्याचा अधिकार नसल्याने त्याने या पक्षांना पक्षांच्या सूचीतून वगळले आहे. आता त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. या संदर्भात लवकरच केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला पत्र लिहून माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी त्यांच्याविषयीची विस्तृत माहितीही देण्यात येणार आहे. या माहितीद्वारे बोर्ड त्यांची अर्थविषयक चौकशी करू शकतो. निवडणूक आयोगाच्या मते या पक्षांची स्थापना निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर काळा पैसा पांढरा करण्यासाठीच करण्यात आली होती. या पक्षांनी २००५ पासून एकदाही निवडणूक लढवलेली नाही. आणखीन काही पक्षांची नावे वगळण्यात येणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत. धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn