Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) सरकार कुणाचेही असले, तरी राममंदिर होणारच !

भाजपचे खासदार विनय कटियार यांची पोकळ गर्जना !
 राममंदिर होणारच, अशी दैववादी घोषणा करण्यापेक्षा सत्ताधारी नेते त्यांच्या क्रियमाणातून
राममंदिर कधी उभारणार ते का सांगत नाहीत ? हिंदु जनतेला तसे आश्‍वासन हवे आहे !
    हाथरस (उत्तरप्रदेश) - अयोध्येत राम जन्मभूमीवर राममंदिर उभारावे, हा आमचा संकल्प आहे; मग कोणतेही सरकार येवो अथवा जावो. अयोध्येत राममंदिर बनवणारच. त्यासाठी कोणतीही तडजोड होणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे खासदार विनय कटियार यांनी येथे केले. (गेल्या २५ वर्षांपासून तडजोड होतच आल्याने राममंदिर उभे राहिले नाही, हेच वास्तव आहे ! - संपादक) हाथरसमध्ये भाजपकडून काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.
    कटियार पुढे म्हणाले की, रामराज्य येईल, असे काम करण्याची आवश्यकता आहे. (केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत सत्ता असतांना रामराज्य आणण्यासारखे काम करायची संधी कटियार यांना आहेच ! - संपादक) जेणेकरून देशात समान नागरी आचारसंहिता लागू होईल. सर्वोच्च न्यायालयाचेही असेच मत आहे. (रामराज्यासारखे राज्य आणण्यासाठी समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयोग का करत नाही ? - संपादक) आपली भाषा उर्दू असो कि हिंदी, भाषेच्या नावावर विभाजन होणार नाही. तीन वेळा तलाक म्हटले म्हणजे नाते संपत नाही. मुसलमान महिलांवर अशा प्रकारचा अन्याय होता कामा नयेे. (कटियार यांनी काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ, तसेच पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदु महिलांवर होणार्‍या अत्याचारांविषयी आणि अन्यायांविषयी काही कृती करावी ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn