Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मराठा आरक्षण विषयावर विधान परिषदेत चर्चा चालू !

विधान परिषद
     नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - मराठा आरक्षण विषयावर नियम २६० अन्वये विधान परिषदेत चर्चा चालू करण्याची अनुमती सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. त्यानुसार चर्चा झाल्यावर राज्य सरकारच्या वतीने त्यावर उत्तर देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण आणि स्वामीनाथन आयोगाच्या मागण्या मान्य करा ! 
- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
      राज्यामध्ये मराठा समाजाचे लक्षावधी संख्येने आरक्षण मिळण्यासाठी मूक मोर्चे निघत आहेत. त्याला सरकारकडून उत्तर दिले जात नाही. सरकारच्या विरोधात मराठा समाजात असंतोष आहे. राज्य शासन मराठा, धनगर, लिंगायत आणि मुसलमान या समाजांना आरक्षण देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. कारण संघ कार्यालयातून आरक्षणाला विरोध केला जात आहे. १४ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा येणार असल्याने सरकारने उच्च न्यायालयात ५ डिसेंबर या दिवशी उच्च न्यायालयात २ सहस्र ७०० पानांचे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले. सरकार समाजात फूट पाडत असून समाजातील इतर घटकही आरक्षण आणि अन्य गोष्टींसाठी मोर्चे काढत आहेत. मराठा आणि अन्य समाजाला न्याय न दिल्यास सरकारविरोधात आगडोंब उसळेल. तसे होणे अपेक्षित नसेल, तर सरकारने मराठा आरक्षण देण्यासमवेत स्वामीनाथन आयोगाच्या मागण्या मान्य कराव्यात.
तत्कालीन आघाडी सरकारने आरक्षण देण्याविषयी प्रयत्न का केले नाहीत ? 
- भाजपचे आमदार प्रवीण दरेकर
      मराठा समाजाचा सरकारवर विश्‍वास असल्यानेच संयत मोर्चे निघत आहेत. मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांच्या वतीने वेळोवेळी मराठा आरक्षण देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तत्कालीन आघाडी शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयात उच्च न्यायालयाने अनेक दोष दाखवून दिले आहेत. त्यावर विरोधी पक्ष बोलत नाही. संविधानानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायचे असेल, तर त्या दृष्टीने तत्कालीन आघाडी सरकारने तसे प्रयत्न का केले नाहीत ? त्यासाठी तत्कालीन सरकारने घटना दुरुस्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असतांना तसे का केले नाही, याविषयी विरोधी पक्षाने उत्तर द्यावे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn