Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांनी दिलेले अमूल्य दृष्टीकोन !

सौ. अश्‍विनी पवार
    ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांना कधी सत्संगाच्या, तर कधी सेवेच्या माध्यमातून वा प्रत्यक्ष सहवासातून सौ. अश्‍विनीताईचा (सौ. अश्‍विनी पवार यांचा) सत्संग मिळतो. देवाने या सत्संगात ताईच्या माध्यमातून दिलेले साधनेचे दृष्टीकोन सर्वांसाठीच आदर्श आहेत.
४. चुका झाल्यावर सत्संग होत असतांना
अ. ‘चुकांविषयी सत्संग होणे’, ही ईश्‍वरी प्रक्रिया आहे. तिच्याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.
आ. मला घडवण्याची प्रक्रिया ईश्‍वरी असून देवच ती घडवत आहे.
इ. सत्संगात गुरुतत्त्व सांगत असते, त्या वेळी सर्व देवाच्या नियोजनाप्रमाणे घडत असते.
ई. देव आपल्याला कशाही पद्धतीने घडवील. चूक नसतांनाही तसे दाखवून घडवील.
५. ‘अपेक्षा करणे’ हा अहंचा पैलू नष्ट करण्यासंदर्भात
अ. ‘मी सांगूनही समोरच्याने तसे केले नाही’, ही प्रतिक्रिया बहिर्मुखतेकडे नेणारी आहे. ‘मी सांगण्यात कुठे अल्प (कमी) पडलो’, ते पहायला हवे.
आ. ‘स्वतः कुठे अल्प पडलो’, ते बघितले, तर समोरच्याकडून अपेक्षा रहात नाही.
इ. अपेक्षा तीव्र असल्यास स्वतःचे योग्य वाटते.
ई. अपेक्षा ठेवली, तर ‘प्रतिसाद कसाही मिळाला’, तरी मनाला त्रास होतो.
उ. आपल्या बोलण्यात अपेक्षा, स्वभावदोष आणि अहं नसल्यावरच देवाचे साहाय्य मिळेल !
६. ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू नष्ट करण्यासंदर्भात
अ. प्रतिमा ही माया, तर निर्मळता हा भगवंत आहे !
आ. प्रतिमेपोटी चूक लपवणे, हे असत्य आहे.
- श्री. संदेश नाणोसकर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०१६) (क्रमश: उद्याच्या अंकात)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn