Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) लोकसभेत मी नोटाबंदीवर बोललो, तर भूकंप येईल ! - राहुल गांधी

काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या घोटाळ्यांवर राहुल गांधी
कधी बोलले नाहीत, तेव्हा त्यांना कोणी रोखले होते ?
     नवी देहली - सरकार नोटाबंदीवरील चर्चेपासून पळत आहे. त्याने मला संसदेत बोलण्याची संधी दिली, तर काय भूकंप येतो, ते तुम्हाला दिसेल, असे विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. (राहुल गांधी यांचे बोलणे काँग्रेसमधील लोकही गांभीर्याने घेत नाहीत, तेथे लोकसभेत त्यांना कोण विचारणार ? - संपादक) राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय हा भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. त्यावर मला लोकसभेत बोलायचे आहे. मी तिथे सर्वकाही सांगीन. महिन्याभरापासून आम्ही नोटाबंदीवर चर्चेसाठी प्रयत्न करत आहोत. हा विषय मार्गी लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. (धादांत खोटे बोलणारे राहुल गांधी ! विरोधक गोंधळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडत असतांना राहुल गांधी यांच्या आम्ही नोटाबंदीवर चर्चेसाठी प्रयत्न करत आहोत, या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? - संपादक)
काँग्रेसच्या सत्ताकाळात झालेल्या लाखो शेतकर्‍यांच्या
आत्महत्या राहुल गांधी विसरले का ? - भाजप
     नोटाबंदीमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचे राहुल गांधी म्हणत आहेत; पण काँग्रेसच्या सत्ताकाळात लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, हे ते विसरत आहेत का ?, असा प्रश्‍न केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला आहे. ज्यांच्या सत्ताकाळात कोळसा, २ जी, राष्ट्रकुल, युरिया, आदर्श असे अनेक घोटाळे झाले आहेत, ते दुसर्‍यांना कसे उपदेश करू शकतात ?, असेही ते म्हणाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn