Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात हरिनाम दिंडीचे आगमन !

विणेला हार घालतांना श्री. विनायक आगवेकर
       देवद (पनवेल), ४ डिसेंबर (वार्ता.) - ज्ञानोबामाऊली-तुकारामच्या गजरात येथील ग्रामस्थ मंडळाच्या हरिनाम दिंडीचे वाजतगाजत आगमन झाले. मंडळाच्या वतीने हरिनाम सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला असून त्याचे यंदाचे १२ वेे वर्ष आहे. त्या अनुषंगाने प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
       दिंडीचे आश्रमात आगमन झाल्यावर विणेकरींचे औक्षण आणि पाद्यपूजन आश्रमातील साधक श्री. विनायक आगवेकर यांनी केले, तर विणेकरींच्या समवेत तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन आलेल्या स्त्रियांचे सौ. श्रद्धा निंबाळकर यांनी औक्षण केले. या वेळी ह.भ.प. गणेश महाराज, देवद येथील ह.भ.प. परशुराम वाघमारे, ह.भ.प. महादू वाघमारे, ह.भ.प. रामभाऊ वाघमारे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दिंडीत महिला आणि लहान मुलेही सहभागी झाली होती. या वेळी ह.भ.प. गणेश महाराज यांच्या वतीने आश्रमाकडून देण्यात आलेला प्रसाद आणि दैनिक सनातन प्रभात आकुर्लीचे ह.भ.प. बामा महाराज भोपी यांनी स्वीकारले.

ह.भ.प. गणेश महाराज यांनी दिंडीच्या माध्यमातून षड्रिपू निर्मूलन  
आणि व्यसन निर्मूलन यांचे कार्य केले ! - श्री. शिवाजी वटकर, हिंदु जनजागृती समिती
      ह.भ.प. गणेश महाराज यांनी एक तपापूर्वी या षड्रिपू निर्मूलन दिंडीच्या माध्यमातून गावोगावी षड्रिपू निर्मूलन आणि व्यसननिर्मूलन यांचे कार्य केले. सनातन संस्थेत साधनेच्या जोडीला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांनाही अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. ह.भ.प. गणेश महाराज यांचे नेहमीच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना साहाय्य असते.
  • क्षणचित्र - दिंडीच्या स्वागतासाठी आश्रमाच्या प्रवेशद्वारापासून ते आतपर्यंत साधक हात जोडून उभे होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn