Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
      सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१२.१२.२०१६ - तिरुवण्णामलई, तमिळनाडू परात्पर गुरु डॉ. आठवले 
यांच्या आरोग्यावरील संकट दूर व्हावे आणि साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी विविध होम करणे
कलशांची पूजा करतांना सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ आणि यज्ञ करणारे पुरोहित
     आज पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यावरील संकट दूर होण्यासाठी काही विधींचा संकल्प केला होता. तसेच साधकांचे रक्षण व्हावे, हाही उद्देश होता. त्यामध्ये सकाळी ९.३० वाजता कलशांमध्ये जल घेऊन त्यांची माझ्या हस्ते पूजा करण्यात आली. प्रत्येक कलशात वेगवेगळ्या देवतांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत विविध होम झाले, उदा. गणेश याग, चंडी होम, बगलामुखी याग, भुवनेश्‍वरी याग, महाकाली याग, तसेच दिक्पाल, नवग्रह आणि अष्टभैरव या देवतांचे होम. त्यांसाठी केरळमधील पालक्काड येथून नंबुद्री (यज्ञ करणारे) आले होते. विविध देवतांना आहुती मिळाव्यात आणि त्या संतुष्ट व्हाव्यात, हा या होमांचा उद्देश होता. त्यानंतर केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी महामृत्यूंजय होम करण्यात आला. त्यामध्ये अमृतवेल (गुळवेल) वनस्पतीच्या आहुती देण्यात आल्या. याचा उद्देश परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती वाढावी, हा होता. त्यानंतर रात्री १०.३० वाजता पूर्णाहुती झाली.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ (१२.१२.२०१६, दुपारी २)
      (प्रत्यक्षातही माझी प्राणशक्ती आदल्या दिवशी ३३ टक्के होती, ती ३७ टक्के इतकी झाली.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn