Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे दत्तमालामंत्राचे पठण केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिराजवळील परिसरात औदुंबराची रोपे उगवणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाले. त्या दिवसापासून आश्रमात दिवसेंदिवस दत्ततत्त्व वाढत असल्याची प्रचीती साधकांना येत आहे आणि आश्रम परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट झाला आहे. पठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारील यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची २०२ रोपे आपोआप उगवली आहेत.
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या कृपेमुळे अनुभवायला मिळालेल्या चैतन्यरूपी आशीर्वादाविषयी सनातनच्या सर्व साधकांच्या वतीने त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !


सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिराजवळील परिसरातील औदुंबराची रोपे
औदुंबराची ७० हून अधिक छोटी रोपे उगवलेली असणे (डिसेंबर २०१५)


औदुंबराच्या एकूण रोपांची संख्या १५० हून अधिक होणे (सप्टेंबर २०१६)

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn