Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोमलला मैत्रिणींकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळाल्यावर ‘आपण हिंदु असल्याने गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे करूया’, असे सांगणे

कु. कोमल दळवी
‘माझी मुलगी कु. कोमल दळवी ही बी. फार्मसीला शिकत आहे. ३१ डिसेंबर २०१४ ला रात्री ११ वाजता कोमलला दूरध्वनीवर ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा !’ असा लघुसंदेश सर्व मित्र-मैत्रिणींनी पाठवला होता. या लघुसंदेशला उत्तर; म्हणून तिने ‘हिंदू आहे, हिंदूच रहाणार ! आम्ही गुढीपाडवा या दिवशी शुभेच्छा देणार !’ असा लघुसंदेश सर्व मित्र-मैत्रिणींना पाठवला. थोड्या वेळाने कु. कोमलने हे सर्व मला सांगितले आणि मला प.पू. गुरुदेव यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. हे केवळ प.पू. गुरुदेवच करू शकतात. 
      ३१ डिसेंबर या दिवशी कोमलच्या मैत्रिणींनी तिला दूरभाष केला, ‘आज आपण पार्टी करूया !’ तेव्हा कोमलने तिच्या मैत्रिणींना ठामपणे उत्तर दिले, ‘‘मी एक दिवसासाठी धर्मांतर करणार नाही. मी हिंदू आहे आणि हिंदूच रहाणार. एका दिवसासाठी मी पाप करणार नाही.’’ कोमलने तिच्या मैत्रिणींनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, ‘‘तुम्हीसुद्धा जाऊ नका. हे योग्य नाही.
आपण हिंदू आहोत ना ! मग का अशी अयोग्य कृती करता ? नका जाऊ.’’ हे सर्व तिने घरी आल्यावर मला सांगितले. ऐकता-ऐकता माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते. प.पू. गुरुदेव, तुम्हीच तिच्यामध्ये सर्व पालट केलेत. आपण साक्षात् ईश्‍वरच आहात. आपल्या कृपेमुळे मुलांमध्येे सकारात्मक विचार निर्माण झालेत. त्याविषयी कोटी-कोटी कृतज्ञता.’
- सौ. शोभा दळवी, कळंबोली, जिल्हा रायगड. 

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn