Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसंदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

        ‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. या विषयीची सविस्तर माहिती ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या नियमित सदरात आपल्याला मिळेल. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !
६. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची सूक्ष्मातील 
आणि स्थुलातील प्रक्रिया समजून घ्या !
६ अ. भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होण्यामागील आध्यात्मिक कारणे : ‘स्थुलातून घडणार्‍या घटनांमागे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणे असतात. त्यापैकी शारीरिक आणि मानसिक कारणांविषयी ती घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांतील विचारवेत्त्यांकडून चर्चा होत असते. आध्यात्मिक कारणे ही बुद्धीअगम्य असल्याने बुद्धीप्रामाण्यवादी लोकांना त्याविषयी चर्चा करण्यास मर्यादा येतात. बुद्धीप्रामाण्यवादी लोक बुद्धीचा वापर करून प्रमाण ठरवत असल्याने ते स्थुलातील कारणांचा विचार करू शकतात. याउलट चांगली साधना करणारे किंवा अध्यात्मात प्रगती केलेले उन्नत साधक विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्यातील विचार ग्रहण करू शकतात. यालाच ‘सूक्ष्मातील कळणे’, असे म्हणतात. या लेखात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात प्रामुख्याने बुद्धीअगम्य आध्यात्मिक कारणांचा वेध घेतला आहे.
६ अ १. कालमाहात्म्य : कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ येणे आवश्यक असते. द्रष्ट्या आणि त्रिकालज्ञानी संतांना ‘योग्य वेळी काय करायचे’, याचे ज्ञान असते; म्हणूनच ते कालगतीनुसार ‘एखादी गोष्ट सध्या करू नये किंवा पुढे करावी’, असे सांगतात. आज ‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, अशी आशा निर्माण होण्यासारख्या कोणत्याही घटना स्थुलातून घडत नसतांना ‘हिंदु राष्ट्रा’विषयी इतक्या ठामपणे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण काळाची पावले ओळखणार्‍या संतांना २०२३ या वर्षी स्थापन होणार्‍या ‘हिंदु राष्ट्रा’ची चाहूल लागली आहे ! पुढील सूत्रे लक्षात घेतली, तर सर्वांनाच कालमाहात्म्य लक्षात येईल. 
अ. उन्हाळ्यात शेतात पेरणी करत नाहीत, तर ती करण्यासाठी पावसाळ्यापर्यंत थांबतात.
आ. श्रीराम १४ वर्षे वनवासात राहिला आणि नंतरच त्याने अयोध्येचे राजेपद स्वीकारले.
इ. द्रौपदीची राजसभेत विटंबना झाली, तरी श्रीकृष्णाने तेव्हाच कौरवांचा नाश केला नाही, तर १३ वर्षांनंतर केला. 
ई. शिशूपालाचे शंभर अपराध पूर्ण झाल्यानंतरच त्याचा श्रीकृष्णाने वध केला. 
उ. क्रांतीकारक कालमाहात्म्य लक्षात न घेता भावनेपोटी कृती करतात. त्यामुळे बर्‍याच जणांना यश न मिळताच मृत्यू येतो. त्यांच्या कृतीमुळे त्यांची प्राण अर्पण करण्याची व्यष्टी साधना होते; पण समष्टीला त्याचा विशेष लाभ होत नाही. याउलट क्रांतीकारक अरविंद घोष यांनी साधनेत प्रगती केली असल्यामुळे त्यांना ‘१९४७ साली भारत स्वतंत्र होणार आहे’, हे आधीच सूक्ष्मातून कळले होते. त्यामुळे त्यांनी क्रांतीचे विचार मनातून काढून टाकले. ते महर्षी झाले आणि त्यांनी लाखो जिवांना साधनेत मार्गदर्शन केले. (क्रमश:) ॐ
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’) 
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn