Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उत्तम नियोजनासहित सहजतेने सेवा करणारे आणि आनंदी श्री. अमोल बधाले !

श्री. अमोल बधाले
‘     श्री. अमोल बधाले हे ग्रंथांची सेवा चालते तेथे सेवा करतात. गेल्या काही दिवसांपासून ते पुढाकार घेऊन सेवा करत आहेत. सहसाधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि जाणवत असलेला पालट पुढीलप्रमाणे आहेत. 
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. इतरांना समजून घेणे
    साधकांना येणार्‍या अडचणी ते समजून घेऊन बोलतात. काही वेळा साधक काहीही न बोलता त्यांच्या अडचणी ते समजून घेतात आणि त्यानुसार ते त्यांना साहाय्य करतात.
१ आ. सतत हसतमुख आणि वर्तमानकाळात राहणे
    परिस्थिती कशीही असो किंवा ते आजारी असो. ते परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करून वर्तमानकाळात असतात.
१ इ. साधकांच्या वयोमानुसार त्याचे वागणे असणे
     आश्रमात वावरतांना ते लहान, वयस्कर आणि त्यांच्या वयाच्या साधकांशी त्यांच्या वयाप्रमाणे वागतात. त्यामुळे ते साधकांचे लाडके आहेत, असे वाटते.’
- सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ ई. सहजतेने सेवा करणे
    श्री. अमोल बधाले वयाने लहान असूनही आणि सेवेचा पुष्कळ अनुभव नसतांनाही ते कुठलीही सेवा सहजपणे करतात.
१ उ. सेवेचे नियोजन उत्तम प्रकारे करणे
     कुठल्या साधकाला कोणती सेवा देऊन अल्प कालावधीत त्या साधकांकडून ती सेवा पूर्ण करवून घ्यायची याचे नियोजन श्री. अमोल उत्तम प्रकारे करतात. आश्रमातील अल्पाहार सेवेसाठी सहसाधकांनी जायचे नियोजन स्वयंपाकघराचा काही अनुभव नसतांनाही एखाद्या गृहिणीप्रमाणे करतात आणि त्या सेवेत ते स्वतःही सहभागी होतात. 
१ ऊ. सेवा तत्परतेने करणे
    कुठलीही सेवा करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. पूर्वी त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास व्हायचा. तेव्हा सेवेमधील सहभाग अल्प असायचा. आता सेवांमध्ये सहभाग वाढवल्यापासून त्यांचा शारीरिक त्रास अल्प झाल्याचे जाणवते. 
१ ए. स्वतःचा विचार न करता गुरुकार्याचा विचार करणे
     दिवाळीच्या कालावधीत बरेच साधक घरी गेले होते. त्या वेळी त्यांनी घरी जाण्याचे आरक्षण रहित करून सेवेला प्राधान्य दिले. त्यांनी पुढाकार घेऊन सेवा सांभाळल्या. त्यात त्यांनी स्वत:च्या प्रकृतीचीही सवलत घेतली नाही.
१ ऐ. कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सह साधकांची काळजी घेणे
     काही दिवसांपूर्वी एका साधिकेला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे संतांनी तिची दृष्ट काढायला सांगितली होती. दृष्ट काढल्यावर ती पाण्यात सोडण्यासाठी कोणी साधक न मिळाल्यास श्री. अमोल यांना कितीही तातडीची सेवा असली, तरी ते स्वतः जात असत. एकदा अल्पाहाराची सेवा करण्यासाठी साधक न मिळाल्यामुळे ते महाप्रसादाचे (जेवणाचे) वाढलेले ताट झाकून ठेवून त्या सेवेसाठी गेले आणि सेवा पूर्ण झाल्यावर रात्री उशिरा त्यांनी महाप्रसाद ग्रहण केला. आजकाल कुटुंबांमध्येही असे कोणी इतरांसाठी झोकून देऊन करणारे नसतात. त्यामुळे साधकांना श्री. अमोल यांचा पुष्कळ आधार वाटतो. 
१ ओ. कुटुंबियांनी साधनेत साहाय्य करणे 
     श्री. अमोल कुटुंबियांचे दायित्वही चांगल्या प्रकारे पहातात. कुटुंबीय साधनेत टिकून रहाण्यासाठी ते वेळोवेळी त्यांना साधनेचे दृष्टीकोन देत असतात. 
१ औ. व्यष्टी साधने संदर्भात गांभीर्याने प्रयत्न करणे
     श्री. अमोल यांना व्यष्टी साधनेविषयी काही अडचण असल्यास ते पू. पात्रीकरकाका यांच्याशी तप्तरतेने बोलून घेतात. ते व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करतात. 
२. जाणवत असलेले पालट 
२ अ. आनंदी असणे
     गेल्या काही दिवसांपासून अमोलदादा अधिक आनंदी दिसत आहेत. तातडीच्या किंवा महत्त्वाच्या सेवा करतांनाही त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताही ताण दिसत नाही. 
२ आ. सर्तकता वाढणे
     सेवेत चुका होऊ नयेत, यासाठी त्यांच्यातील सतर्कता वाढलेली दिसते. 
     श्री. अमोल यांची साधनेत लवकरात लवकर प्रगती होऊ दे, अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे.’ 
- ग्रंथ सेवेतील सर्व साधक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn