Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बेंगळुरू येथे दीडशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ८ वर्षांनंतर निकाल !

  • मुख्याध्यापकाच्या विरोधात माजी विद्यार्थ्याच्या तक्रार खटल्यावर सरकारचे १५ लाख रुपये खर्च !
  • एका लहान प्रकरणात एवढी वर्षे न्यायदानासाठी लागत असतील, तर न्यायालयात प्रलंबित असलेल्या कोट्यवधी प्रकरणांमध्ये न्यायदानासाठी किती वर्षे लागतील ? हिंदु राष्ट्रात जनतेला त्वरित न्याय दिला जाईल !
बेंगळुरू (कर्नाटक) - येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडून दीडशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अनुमाने ८ वर्षे खटला चालला. या खटल्याच्या सुनावणीवर पोलिसांकडून सरकारी तिजोरीतील १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. नुकतीच या प्रकरणात न्यायालयाने मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका केली आहे.
    वर्ष २००५ मध्ये इयत्ता नववीत असतांना अनिलने शाळेतून नाव काढून घेतले होते. जुलै २००८ मध्ये ‘ट्रान्सफर सर्टीफिकेट’ घेण्यासाठी तो शाळेत गेला होता. त्या वेळी मुख्याध्यापक चन्ना बायरेगौडा यांनी त्याला १५० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप अनिलने केला होता. त्याने या प्रकरणाची तक्रार कपोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुख्याध्यापकाला अटक केली होती. या खटल्यांच्या सुनावणीला अनिल ४ वर्षे उपस्थित राहिला नाही. लाच मागितल्याचे पोलीसही सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे या मुख्याध्यापकांना ८ वर्षांनंतर निर्दोष मुक्त करण्यात आले आहे; मात्र तोपर्यंत पोलिसांनी हे प्रकरण चालू ठेवल्याने सरकारी तिजोरीतील १५ लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. मुख्याध्यापक बायरेगौडा अजूनही त्याच शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn