Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवद आश्रमात प्रवेश करताच विसरून जातो जगाचे भान ।

कु. उदय पाटील
देवद आश्रमातील वातावरण 
आहे खूपच छान ।
साधकांचा मंजूळ आवाज ऐकून 
तृप्त होतात कान ॥ १ ॥

संतांची वाणी ऐकून पक्षीही 
डोलवतात मान ।
सात्त्विक वातावरण 
आकर्षित करून घेते ध्यान ॥ २ ॥
आश्रमात प्रवेश केल्यावर विसरून जातो जगाचे भान ।
प.पू. पांडेबाबांच्या वाणीतून सुटतो सात्त्विकतेचा बाण ॥ ३ ॥

जो नष्ट करतो डोक्यावरचा सगळा ताण ।
ईश्‍वराच्या अनुसंधानात हरवते भूक नि तहान ॥ ४ ॥

आश्रमातून शिकतो आपण गोष्टी लहानसहान ।
कारण आपले गुरुदेवच आहेत खूप महान ॥ ५ ॥

- कु. उदय पाटील (वय १४ वर्षे), जळगाव (१९.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn