Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तिस्ता सेटलवाड यांनी संस्थेच्या निधीत अपहार केल्याचे पोलिसांकडे पुरावे !

    पुरोगामी आणि निधर्मीवादी समाजसेवेच्या नावाखाली लोकांकडून आणि विदेशातून पैसे घेऊन त्याचा अपहार करतात, हे यातून उघड होते ! आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संस्थेतही घोटाळ झाल्याचे पुरावे माहितीच्या अधिकाराखाली समोर आले असतांना महाराष्ट्र सरकार त्यावर कारवाई कधी करणार ?
    नवी देहली - तिस्ता सेटलवाड आणि तिचे पती जावेद आनंद यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेला वर्ष २००२च्या गुजरात दंगलीतील पीडितांच्या साहाय्यासाठी मिळालेल्या ९ कोटी ७५ लाख रुपयांच्या देणगीतील ३ कोटी ८५ लाख रुपये वैयक्तिक उपयोगात आणल्याचे कागदोपत्री पुरावे मिळाले असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे. वैयक्तिक वापरासाठी केलेल्या अपहाराच्या पैशातून तिस्ता यांनी विदेशी मद्य आणि पंचतारांकित उपहारगृहे यांवर व्यय केल्याचेही आढळून आले आहे.
१. गुजरात पोलिसांचे साहाय्यक आयुक्त राहुल पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, तिस्ता सेटलवाड आणि तिचे पती जावेद आनंद यांनी गुजरात दंगलीतील पीडितांच्या साहाय्यासाठी सेंटर फोर जस्टीस अ‍ॅण्ड पीस आणि सबरंग या दोन सेवाभावी संस्थांसाठी देणग्या गोळा केल्या होत्या. दंगलीतील पीडितांनी त्यांना साहाय्य मिळाले नसल्याच्या तक्रारी केल्यामुळे या संस्थांच्या हिशेबांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकास तिस्ता सेटलवाड आणि तिचे पती जावेद आनंद यांनी असहकार्य केले होते.
२. तिस्ता सेटलवाड आणि तिचे पती जावेद आनंद यांच्यावर झालेल्या आरोपांत सकृतदर्शनी पुरावे आढळल्याने पोलिसांनी त्यांना अटक करण्याची सिद्धता केली होती; मात्र या दांपत्याने उच्च न्यायालयात अटक करू नये अशा विनंतीची दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
    त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर सर्वोच्च न्यायालयाने अटकेस स्थगिती देऊन गुजरात पोलिसांना संस्थाचालकांविरुद्ध पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी  सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले.
३. तिस्ता सेटलवाड आणि तिचे पती जावेद आनंद यांनी अपहार केलेल्या रकमेत केंद्रशासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वर्ष २०११ ते २०१२ मध्ये दिलेल्या १ कोटी ४० लाख रुपयांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. (याचाच अर्थ भारतीय जनतेचा पैसा तिस्ता सेटलवाड यांच्या आणि अशाच अनेक सेवाभावी संस्थांनी व्यय करून कुणाची सेवा केली हे लक्षात येते. या सर्व संस्थाचालकांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी जनता करत आहे. - संपादक)
    या अपहारासाठी तिस्ता सेटलवाड आणि तिचे पती जावेद आनंद यांनी विविध बँकांत अनेक नावांनी खाती उघडली आणि त्यात निधीचा भरणा केला. तसेच गुजरात पीडितांच्या न्यायालयातील खटल्याचे काम अनेक अधिवक्त्यांनी कोणतेही शुल्क न घेता चालवले असले, तरी त्यापोटी ७१ लाख ४० सहस्र रुपये व्यय झाले, असे संस्थांच्या हिशेबात दाखवण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn