Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संभाजी ब्रिगेडच्या चेतावणीनंतरही सांगलीत हे राम नथुरामचा प्रयोग कोल्हापूरप्रमाणेच हाऊसफुल !

श्री. शरद पोंक्षे (डावीकडून दुसरे) यांच्याशी
चर्चा करतांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी

          सांगली, २१ डिसेंबर (वार्ता.) - सांगली येथे होणारा हे राम नथुरामचा प्रयोग उधळू अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडने दिली होती. प्रत्यक्षात मंगळवारी रात्री भावे नाट्यमंदिर येथे संभाजी ब्रिगेडचा एकही कार्यकर्ता फिरकला नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचा बार फुसका निघाला. सांगलीतील नाटकाचा प्रयोगही प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे कोल्हापूरप्रमाणेच हाऊसफुल झाला. या नाटकासाठी ब्राह्मण सभा, श्रीशिवप्रतिष्ठान, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणाताही अनुचित प्रकार होऊ नये यांसाठी भावे नाट्यमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. २१ डिसेंबर या दिवशी सातारा येथे होणारा प्रयोगही यशस्वी होणारच असा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला आहे.
पू. संभाजीराव 
भिडेगुरुजी यांच्याशी चर्चा !
          या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. नितीन चौगुले उपस्थित होते.
गांधीजींच्या विचारांचा अवमान त्यांना 
मानणार्‍या कार्यकर्त्यांकडूनच ! - शरद पोंक्षे
          हे राम नथुराम हे नाटक पूर्णपणे कायदेशीर असून त्याला परीनिरीक्षण मंडळाची मान्यता आहे. गांधीजींचे समर्थक म्हणून घेणारे नाटकाला हिंसेच्या पातळीवर उतरून बंद पाडण्याची चेतावणी देणारे गांधींजींच्या विचारांचा अवमान करत आहेत. त्यामुळे ते खरोखर गांधी विचारांचे समर्थक आहेत का ? यावरच विचार करण्याची आवश्यक आहे, असे मत श्री. पोंक्षे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
          पू. भिडेगुरुजी यांनी श्री. पोंक्षे यांना १ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात होणार्‍या गडकोट मोहिमेचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण श्री. पोंक्षे यांनी स्वीकारले. या वेळी पू. भिडेगुरुजी म्हणाले, तुमच्या प्रयोगास कोठेही अडचण आल्यास आम्हाला हाक मारा. तुमचे प्रयोग महाराष्ट्रात कोणतीही अडचण न येता पार पडतील, याची दक्षता श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते घेतील.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn