Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शाश्‍वत सत्य शेष रहाते आणि शाश्‍वताला धरून गेल्यावरच जीवनाची नौका पार होऊ शकते !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन 
प.पू. परशराम पांडे महाराज
       ‘सत्यमेव जयति ।’, म्हणजे ‘सत्याचा विजय होतो.’ सत्यासमोर सर्वकाही खोटे आहे; कारण सत्य शाश्‍वत आहे. आपण काय करतो, तर असत्याला सत्य समजून चालतो. असत्याला सत्य समजूनच आपले आतापर्यंतचे जीवन व्यतित झाले आहे. निखळ सत्य न कळल्यामुळे आपले सहस्रो (हजारो) जन्म झाले. वयोमान आणि कालपरिस्थितीला अनुसरून प्रत्येकाचे जे गट बनतात, त्याला सत्य समजून प्रत्येक जीव जीवन कंठतो. 
१. जसे लहानपणी खेळणी, खेळ वा मित्रमंडळी हेच सत्य समजून चालतो. त्या वेळेचे वागणे ‘बरोबरच आहे’, असे समजून तो वागतो. 
२. मोठे झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने जे काही मित्रमंडळ वा काम चालते, तेच वातावरण सत्य समजून वागतो. असे जीवन होता होता संपून जाते.
३. त्याच सुमारास एखाद्याला गुरु भेटले की, ते सांगतात, ‘‘हे म्हणजे सत्य नाही. खरे शाश्‍वत सत्य वेगळेच आहे.’’ पुढे गुरूंमुळे त्याला अनुभूती येते. साधनेद्वारे जेव्हा त्याला हे कळू लागते, तेव्हा त्याला सत्य कळते. तेव्हा त्याला आनंद मिळतो; म्हणून सत्याला महत्त्व आहे आणि सत्य समजणे महत्त्वाचे ठरते. सत्य केवळ गुरुच सांगू शकतात; कारण गुरूंनी त्याची अनुभूती घेतलेली असते. 
     शाश्‍वत सत्य शेष रहाते. ‘ब्रह्मापासून मुंगीपर्यंत जे सर्व जगत आहे, ते सर्व प्रलय झाल्यावर नाहीसे होणार आहे’, हे शाश्‍वत सत्य आहे. जे सत्-चित्-आनंदमय आहे, त्याला लय नाही; म्हणून कोणताही प्रसंग असो, अशा शाश्‍वताला धरून गेलो, तर जीवनाची नौका पार होऊ शकते, तोच तुम्हाला तारणारा आहे; म्हणून ‘सत्यमेव जयति ।’ हे सिद्ध होते.’ 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.८.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn