Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘सीबीआय’सारखी यंत्रणा सारासार विचार न करता तपास करते, हे धक्कादायक !

‘सीबीआय’च्या तपासाविषयी उच्च न्यायालयाचे मत
       मुंबई, २० डिसेंबर - २०१४ मध्ये अ‍ॅग्नेलो वालद्रिस (वय २५ वर्षे) या युवकाच्या वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात झालेल्या मृत्यूविषयी ‘सीबीआय’ने आरोप असलेल्या १० पोलिसांवरील हत्या, अनैसर्गिक संबंध, अपहरण, खोटे पुरावे सादर करणे आदी गंभीर गुन्हे हटवून किरकोळ गुन्हे नोंदवले. या प्रकरणी सकृत पुरावे असतांना सीबीआयने गंभीर गुन्ह्यांच्या दिशेने तपास केला नाही, असा ताशेरा ओढून ‘सीबीआय’सारखी तपासयंत्रणा सारासार विचार न करता तपास करते, हे पाहून धक्का बसला’, असे मत व्यक्त केले. उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतामुळे ‘सीबीआय’सारख्या महत्त्वाच्या तपासयंत्रणेच्या तपासकार्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. १९ डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मारे आणि न्यायमूर्ती ए.एम्. बदर यांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
       पोलिसांकडून तपास पुढे जात नसल्याचे लक्षात आल्यावर अ‍ॅग्नेलो याच्या वडिलांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या प्रकरणात सकृतदर्शनी पोलिसांविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आणि हत्या केल्याचा गुन्हा सिद्ध होत आहे, अशी भूमिका उच्च न्यायालयाने मांडली आहे. याविषयी ‘२ मासांत अन्वेषण करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करा’, असा निर्देश उच्च न्यायालयाने दिला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn