Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत एकमताने संमत !

     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - विधानसभेत तत्कालीन राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्या अवमानप्रकरणी अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावर प्रविष्ट केलेला हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग समितीने १५ डिसेंबर या दिवशी एकमताने तो मान्य केला. सुनील देशमुख यांनी श्री. गुडेवार यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. याचा अहवाल आज सभागृहाने स्वीकारला. हा प्रस्ताव प्रविष्ट केल्यानंतर हक्कभंग समितीने त्यांना महत्त्वाच्या पदांवर नेमणूक न देण्याचा निर्णय घेतला आहे. गुडेवारा सध्या पुणे येथे ग्रामीण विकास उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. 

     गुंडेवार हे अमरावतीमध्ये आयुक्त म्हणून कार्यरत असतांना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक प्रकल्प संमत करून घेतला होता. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार या प्रकल्पाचा बृहद् आराखडा न मांडता थेट प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. याला केंद्र सरकारनेही तातडीने मान्यता दिली होती; मात्र या प्रकल्पाच्या मान्यतेनंतर सुनील देशमुख यांचा अवमान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर गुडेवार यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता. 
कोणत्या शिफारशी करण्यात आल्या... 
१. सभागृहात बोलावून मुख्य सचिवांकडून समज देण्यात यावी. 
२. गुडेवार यांना दिवसभर सभागृहात बसवून ठेवावे. 
३. कोणत्याही कार्यकारी पदावर नियुक्त केले जाऊ नये.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn